‘द फेव्हरेट’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ‘ऑलिव्हिया कोलमन’ने ९१व्या ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर आपले नाव कोरले. या चित्रपटाचे दिग्दर्शन यॉरगोस लँथॉयमस यांनी केले आहे. सतराव्या शतकात ‘अॅनी’ ग्रेट ब्रिटेनची राणी होती. या चित्रपटात ऑलिव्हियाने याच अॅनीची भूमिका साकारली आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या नामांकन गटात मेलिसा मॅकार्थी, लेडी गागा, ग्लेन क्लोज, यालित्झा अप्रेसिओ या इतर चार अभिनेत्री होत्या. यांतील प्रत्येक अभिनेत्रीने आपली कलाकृती सादर करताना त्यात अक्षरक्ष: जीव ओतला आणि व्यक्तिरेखा जिवंत केली. परंतू द फेव्हरेट मधील अॅनी इतरांच्या तुलनेत काहिशी उजवी ठरली परिणामी ‘ऑलिव्हिया कोलमन’ला ऑस्कर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

‘द फेव्हरेट’मधील ग्रेट ब्रिटेनच्या राणीची भूमिका साकारताना ऑलिव्हियाने सहज, सुंदर, व उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. पटकथा, अनुभवी कलाकार व उत्तम दिग्दर्शन हे या चित्रपटाचे सर्वात प्रभावी घटक मानले जात होते. परंतु ऑलिव्हिया या तिन्ही घटकांवर वरचढ ठरली. आपली भूमिका वठवताना तीच्या तोंडी आलेले संवाद अतिशय अर्थपूर्ण वाटतात. तिने उच्चारलेल्या प्रत्येक वाक्याची धार जणू प्रेक्षकांच्या अंत:करणात पोहोचते. एक कलाकार म्हणून तीच्या आयुष्यातील ही एक संस्मरणीय कलाकृती आहे. आणि त्यामुळेच २०१९ मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान ‘ऑलिव्हिया कोलमन’ने मिळवला.

Story img Loader