पत्नीने मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने अभिनेता ओम पुरी यांनी मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ओम पुरी यांची पत्नी नंदिता हिने वर्सोवा पोलिसांत मारहाणीची तक्रार केली आहे. घराच्या देखभाल खर्चावरून पुरी यांच्यासोबत वाद झाल्यानंतर पुरी यांनी आपल्याला मारहाण केल्याचे नंदिता यांनी म्हटले आहे. पुरी यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांअंतर्गत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदिता यांनी तक्रार दाखल केली त्या वेळेस पुरी हे चित्रिकरणानिमित्त मुंबईबाहेर होते. त्यामुळे घरी परतल्यानंतर त्यांनी अटक होण्याच्या भीतीने मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज केला. बुधवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Story img Loader