आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले ओम पुरी लवकरच ‘द हंड्रेड फूट जर्नी’ या हॉलिवूडपटात काम करताना दिसणार आहेत. याच नावाच्या रिचर्ड सी मोरीस यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असून, स्टिव्हन स्पिलबर्ग आणि ओपरा विनफ्रे त्याचे निर्माता आहेत.  या आधी देखील हॉलिवूड चित्रपटात काम केलेले ओम पुरी या चित्रपटात ‘पापा’ नावाच्या एक मुस्लिम शेफची भूमिका करीत आहेत, ज्याचे फ्रान्समधील एका छोट्याशा शहरात स्वत:चे भारतीय रेस्तरॉं आहे. या चित्रपटात मॅडम माल्लोरीच्या भूमिकेत हेलन मिल्लर दिसणार असून, हसन या ओम पुरीच्या मुलाच्या भूमिकेत मनिष दयाळ दिसणार आहे. ओम पुरी ‘द हंड्रेड फूट जर्नी’च्या चित्रीकरणास ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस सुरूवात करतील.

Story img Loader