पत्नी आणि मुलाचा अंतरिम देखभाल खर्च म्हणून महिना २.९० लाख रुपये देण्याचे आदेश कुटुंब न्यायालयाने गेल्या आठवडय़ात अभिनेता ओम पुरी यांना दिले आहेत. दोघेही उच्चभ्रू वर्गाशी संबंधित आहेत आणि त्यामुळे त्यांचे राहणीमान लक्षात घेता महिना सव्वा लाख रुपये देखभाल खर्च पुरेसा नसल्याचे न्यायालयाने देखभाल खर्चाचे आदेश देताना नमूद केले.
पुरी यांनी गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पत्नी नंदिता यांनी देखभाल खर्चासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अर्जात नंदिता हिने आपण गृहिणी असून उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसल्याचा तसेच पुरी हे महिना ३५ ते ४० लाख रुपये कमावत असल्याचा दावा केला होता, तर पुरी यांनी घटस्फोटाच्या अर्जात नंदिता ही मालमत्तेच्या वादातून आपली छळणूक करीत असल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे एक पती आणि पिता म्हणून आपण आपले कर्तव्य चोखपणे बजावत आल्याचाही दावा केला होता. नंदिता यांनी खर्चाची नऊ पानी यादी न्यायालयाकडे सादर केली होती. त्यात त्यांनी नोव्हेंबर २०१२ चा मासिक खर्च पाच लाख रुपयांहून अधिक दाखविला होता. वाढदिवस आणि दिवाळीच्या भेटींचाच खर्च एक लाख रुपये असल्याचे या यादीत म्हटले होते.
मात्र, ही रक्कम अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच नंदिता हिचे उत्पन्न पुरेसे नसले तरी सोसायटीच्या देखभाल खर्चासह वीज, दूरध्वनी, आरोग्य-जीवन विम्याचा खर्चही नंदिताच देते. शिवाय प्राप्तिकर वगळता पुरी यांचे महिना उत्पन्न हे १५ लाख आहे. त्यामुळे पुरी यांनी महिना २.९० लाख रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नंदिता हिने आपण गृहिणी असून उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसल्याचा तसेच पुरी हे महिना ३५ ते ४० लाख रुपये कमावत असल्याचा दावा केला होता, तर पुरी यांनी नंदिता ही मालमत्तेच्या वादातून आपली छळणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.
अभिनेते ओम पुरी यांना न्यायालयाचा दणका
पत्नी आणि मुलाचा अंतरिम देखभाल खर्च म्हणून महिना २.९० लाख रुपये देण्याचे आदेश कुटुंब न्यायालयाने गेल्या आठवडय़ात अभिनेता ओम पुरी यांना दिले आहेत.
First published on: 08-10-2013 at 03:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Om puri told to pay rs 2 90 lakh per month to wife and son