नव्या आणि अनोख्या भूमिकांचं आव्हान स्वीकारत दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता राजकुमार रावच्या आगामी ‘ओमर्ता’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद ओमर सईद शेखच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार या दहशतवाद्याची मुख्य भूमिका साकारत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच राजकुमारच्या भूमिकेचे पैलू पाहायला मिळत आहेत. भूमिका जगतात कशी, हे तो प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगून जातो. लंडन आणि भारतात याची शूटिंग पार पडली असून काही दहशतवादी हल्ल्यांचा चित्रपटाच्या कथेत समावेश करण्यात आला आहे. १९९४मधील दिल्ली अपहरण प्रकरण असो, ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला असो आणि २६/११ चा मुंबईतील दहशतवादी हल्ला या घटनाही त्यात दाखवण्यात येणार आहेत.

वाचा : उमेश- तेजश्री म्हणताहेत ‘असेही एकदा व्हावे’

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून पदवी घेतलेला ओमर दहशतवादी कसा होतो, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनापूर्वीच विविध चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने वाहवा मिळवली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मामी चित्रपट महोत्सवातही याचे प्रदर्शन झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हंसल मेहता आणि राजकुमार ही जोडी चौथ्यांदा एकत्र काम करत आहे. याआधी ‘अलिगढ’, ‘सिटीलाइट्स’ आणि ‘शाहिद’ या दमदार चित्रपटांसाठी त्यांनी एकत्र काम केलं होतं.

‘स्विस एंटरटेन्मेंट’ आणि ‘कर्मा मिडिया’ निर्मित ‘ओमर्ता’ हा चित्रपट २० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.