‘द डर्टी पिक्च’ अभिनेत्री विद्या बालनने तिच्या नव्या रुपामुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. महिला जासूसची भूमिका साकारणा-या विद्याने जवळपास १२२ लूक चित्रपटासाठी केले आहेत आणि तिचा प्रत्येक लूक खूप वेगळा आहे.
चित्रपटातील नव्या रुपात विद्या ज्योतिषीच्या वेशात दिसते. डोळ्यावर चष्मा, दाढी, गळ्यात रुद्राक्ष माळा आणि धोती-कुर्तामध्ये ती एकदमच वेगळी दिसत आहे.

यापूर्वी तिचा हैद्राबाद स्थानकाबाहेर भिकारीच्या वेशातला लूक आपल्याला दिसला होता. ‘बॉबी जासूस’च्या ट्रेलरचे अनावरण ख-या जासूसच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येईल. ‘बॉबी जासूस’ हा चित्रपट महिला जासूसवर आधारित असून, ही भूमिका विद्या साकारत आहे.

Story img Loader