बॉलीवूडचा शहेनशा अमिताभ बच्चन याने आपली नात आराध्या हिला तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘मिनी कूपर एस कार’ भेट म्हणून दिली आहे. आज (शुक्रवार) अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनी मुलगी आराध्या आपला पहिला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाची भेट म्हणून कार खरेदी करण्यासाठी संपूर्ण बच्चन कुटुंबीय शोरूममध्ये गेले होते. या कारची किंमत २४ लाख रुपये आहे. आराध्याचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने जवळच्या नातेवाईकांसोबत साजरा करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On first birthday aaradhya bachchan gets a mini cooper