मीडियामध्ये सध्या दीपिका पदुकोण-रणवीर सिंग या जोडीबरोबरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या नात्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर आणि आलियामध्ये फुलत गेलेले मैत्रीचे नाते कधी प्रेमात बदलले ते दोघांनाही कळले नाही. सध्या या जोडीवर मीडियाची बारीक नजर असून पुढच्यावर्षी रणबीर-आलिया विवाह बंधनात अडकतील असे बोलले जात आहे.

आलिया सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. नुकतचं एका पत्रकार परिषदेत महेश भट्ट यांना दोघांच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महेश भट्ट यांनी रणबीर-आलियाच्या नात्यावर शिक्कमोर्तबही केलं नाही किंवा नाकारलही नाही.

मी माझ्या मुलांच्या खासगी आयुष्याबद्दल कधीही बोलत नाही. ते आता मोठे झाले असून काय योग्य ? काय अयोग्य ? ते स्वत: ठरवू शकतात. याबद्दल मी सार्वजनिक ठिकाणी भाष्य करणे योग्य नाही. नात्याबद्दल काही बोलायचे असेल किंवा शांत रहायचे असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. ते त्यांच्या आयुष्याबद्दल काय निर्णय घेतात त्याचा मी आदर करतो असे मेहश भट्ट म्हणाले.

रणबीरने मौन सोडले
‘लग्नाबाबतच्या सर्व चर्चा या ज्यांच्या- त्यांच्या व्यवसायाचाच एक भाग आहे. एका चर्चेपासून दुसरी चर्चा आणि मग तिसरी..अशाप्रकारे अफवा पसरतच जातात. लग्न ही अशी गोष्ट आहे जी योग्य त्या वेळी घडून येते. मी ३५ वर्षांचा झालो आहे, आता लग्न केलं पाहिजे, असं ठरवून करता येत नाही. तुम्ही आणि तुमचा साथीदार मिळून याबाबत विचार केला तर योग्य वेळी सर्व गोष्टी होतात. पण मी सध्या लग्नाबाबत विचार केला नाही,’ असं रणबीर म्हणाला.

‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटात रणबीर- आलिया एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.

Story img Loader