माणसाला रोजच्या तणावापासून दूर जाता यावं, विरंगुळा मिळावा यासाठी मनोरंजन खूप महत्त्वाचे असते. मनोरंजन म्हटलं की चित्रपट आलेच. काल्पनिक, खऱ्या घटनांवर आधारित, रोमँटिक, खळखळून हसवणारे, रडवणारे, सस्पेन्स असणारे, हेरगिरीवर आधारित, देशभक्तिपर, गुन्हेगारीवर आधारित अशा अनेक प्रकारचे अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

द मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने २० सप्टेंबर हा राष्ट्रीय सिनेमा दिवस म्हणून घोषित केला आहे. या दिनानिमित्त चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफरदेखील आहे. फक्त ९९ रुपयांत प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे. संपूर्ण देशभरात चार हजारांपेक्षा जास्त स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”

‘हे’ चित्रपट पाहायला मिळतील

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त कोणते चित्रपट पाहायला मिळतील हे जाणून घेऊयात. ‘युध्रा’, ‘कहाँ शुरू कहाँ खत्म’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘नेव्हर लेट गो’, ‘ट्रान्सफॉर्म्सस वन’, ‘द बकिंगहम मर्डर्स’, असे चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

याबरोबरच, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला ‘स्त्री २’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवा विक्रम रचला आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. आजही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे. याबरोबरच २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ आणि २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वीर झारा’ हे चित्रपट १३ सप्टेंबरला सिनेमागृहात पुन्हा एकदा रिलीज झाले आहेत. हे चित्रपटदेखील २० सप्टेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

द मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले, “२०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या अनेक चित्रपटांचे यश साजरे करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने सर्व वयोगटातील प्रेक्षक हा आनंद साजरा कऱण्यासाठी एकत्र येतील. या यशात ज्या चित्रपटप्रेमींचे योगदान आहे, त्यांना मनापासून आभार आणि जे अजूनही थिएटरकडे परतले नाहीत त्यांना हे आमंत्रण आहे.”

हेही वाचा: ठरलं तर मग : तन्वीSSSS…; २२ वर्षांनी पुन्हा तोच अपघात! प्रतिमाची स्मृती परत येईल का? सायलीच्या योजनेमुळे मालिकेत मोठा ट्विस्ट

ऑनलाइन किंवा थेट चित्रपटगृहातून तिकीट काढता येणार आहे.

दरम्यान, करोना काळात प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहायला येत नव्हते, प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने अनेक नवीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळले. अनेक मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांनादेखील अपयश आल्याचं पाहायला मिळालं. करोना काळात ओटीटीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. त्यांना जगभरातील चित्रपट, शो, वेब सीरिज घरीच बसून पाहता येत होते, त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप कमी होती. लोकांचा घरी बसून चित्रपट पाहण्याकडे कल वाढला, परिणामी चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होऊ लागले. आता तीन-चार वर्षांत परिस्थिती बरीच सुधारली आहे. अशातच प्रेक्षकांना राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्ताने ही ऑफर दिली जात आहे, त्यामुळे कोणत्या चित्रपटांना याचा फायदा होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Story img Loader