गेल्या वर्षी २९ एप्रिल आजच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानचे निधन झाले. आज त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं, या निमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्या आयुष्यातील अशीच एक गोष्ट समोर आली आहे. शेवटच्या क्षणी इरफानला त्याची आई समोर दिसत होती.
इरफानची पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिल हे त्याच्या सोबत शेवटच्या क्षणी होते. बॉम्बेटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुतापा यांनी सांगितलं की, “इरफान त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या आई बद्दल बोलतं होता. इरफान अचानक मला म्हणाला की, बघ अम्मा या रुममध्येच आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “इरफान मला म्हणाला, अम्मा मला घ्यायला आली आहे, बघ. आई, माझ्या बाजूलाचा बसली आहे.” इरफानला वाटतं होतं की त्याची आई त्याच दु:ख कमी करायला आली आहे.
View this post on Instagram
या आधी त्यांचा मुलगा बाबिलने देखील असाच एक खुलासा केला होता. “त्यांचे निधन होण्याच्या दोन-तीन दिवस आधीपासून मी रुग्णालयात होतो. त्यांना काहीच कळत नव्हतं आणि त्यांनी सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगितली..त्यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले..’मी मरणार आहे’ आणि मी त्यांना म्हणालो नाही ‘तुम्ही मरणार नाही’. त्यानंतर ते पुन्हा हसले आणि झोपले,” असं बाबिल म्हणाला.
View this post on Instagram
इरफान खानने ‘तलवार’, ‘पानसिंग तोमर’, ‘पिकू’, ‘लाइफ ऑफ पाई’, ‘हिंदी मीडियम’ इत्यादी सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. इरफान खान एक उत्कृष्ट अभिनेता होता, ज्याच्या अभिनयाला आणि त्याच्यासारख्या व्यक्तीला कोणी विसरणार नाही.