गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री प्रिती झिंटाचे लग्न हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मंगळवारी पुन्हा एकदा या विषयावरून सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली असून, प्रिती झिंटा या ‘व्हॅलेंटाईन डे’ला आपला मित्र जीन गुडइनफसोबत विवाहबद्ध होणार असल्याची माहिती मिळते आहे. या माहितीला अधिकृतपणे कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, प्रिंती झिंटाचे लग्न लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. या आठवड्यातील शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत हा सोहळा चालणार आहे, अशीही चर्चा सुरू आहे. पण ही चर्चा खरी आहे की केवळ सोशल मीडियावरील अफवा हे स्पष्ट झालेले नाही.
प्रिती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया यांच्यामध्ये खूप वर्षे मैत्री होती. पण त्याचे नात्यामध्ये रुपांतर होऊ शकले नाही. उलट या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर प्रिती झिंटाने नेस वाडियांच्याविरोधात विनयभंगाची तक्रारही दाखल केली होती.

Story img Loader