नव्या पिढीला आता पुन्हा एकदा प्रेमाची गंमत अनुभवता येणार आहे. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेले ‘हीच तर प्रेमाची खरी गंमत आहे’ हे अशोक पाटोळेलिखित नाटक रंगभूमीवर सादर होत आहे. या पुनरुज्जीवीत नाटकाचा पहिला प्रयोग २७ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर येथे होणार आहे. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेल्या या नाटकात संजय मोने, शुभांगी गोखले, सुनील बर्वे, मैथिली वारंग, मंगेश कदम आदी कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता पुनरुज्जीवीत नाटकात संतोष मयेकर, आदिती देशपांडे, सुखदा खांडकेकर, रोहित हळदीकर आणि डॉ. अमोल कोल्हे हे कलाकार आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा