बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आपल्या अभिनय, रोमॅंटिक भूमिकांमुळे तसेच हजरजबाबीपणामुळे प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. चाहते असो किंवा पत्रकार त्यांच्या प्रश्नांना तो आपल्या शैलीत उत्तरं देत असतो. शाहरुखने आजवर अनेक मुलाखती दिल्या आहेत. ज्यात त्याला करियरपासून ते अगदी गौरी खान पर्यंत अनेक प्रश्न विचारले आहेत. मात्र एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाने तो चांगलाच लाजला होता.

शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. शाहरुख खान आणि गौरी खानच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. एका कार्यक्रमा दरम्यान पत्रकाराने शाहरुखला गौरीबद्दल प्रश्न विचारला, एरव्ही त्वरित उत्तर देणारा शाहरुख थोडा अडखळत बोलत होता. पत्रकाराने प्रश्न विचारला की, ‘तू स्वतः रोमॅंटिक भूमिका करतोस, मात्र गौर खान तुला कधी अनरोमॅंटिक म्हणाली आहे का? तू रोमॅंटिक पती आहेस का’? शाहरुख हसत अडखळत या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला की ‘या प्रश्नाचं उत्तर कस देऊ? मला खूप लाजल्यासारखं होत आहे. मी एक चांगला साथीदार आहे, मी खुश ठेवू शकतो. मी दुसऱ्याचं पूर्ण ऐकून घेतो. मी दुसऱ्याला हसवू शकतो इतकंच सांगू शकतो’. या कार्यक्रमात इतर पत्रकारांनी याच प्रश्नाशी संबंधित प्रश्न विचारल्यावर मात्र शाहरुख म्हणाला ‘मला खूप लाजल्यासारखं होत आहे या प्रश्नांची उत्तर देताना’. शाहरुखने पुढे उत्तरं देणं टाळलं.

विजय देवरकोंडा व अनन्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘लायगर’ चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

शाहरुख, गौरी मूळचे दोघे दिल्लीचे, दिल्लीत दोघांचे प्रेमप्रकरण जमले मात्र शाहरुखला बॉलीवूडमध्ये नाव कमवायचं होत त्यासाठी तो मुंबईला आला, सुरवातीला मालिका नंतर चित्रपटात त्याला काम मिळू लागले. प्रेमात बरेच चढ-उतार पहिल्यानंतर १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं आणि आता हे तीन मुलांचे आई- वडील आहेत. आजही गौरी खान शाहरुखच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

शाहरुख गौरी या दोघांची मिळून रेड चिलीज एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्था आहे. या संस्थेत गौरी खान चित्रपटाच्या निर्मितीची काम बघते. गौरी स्वतः पेशाने इंटेरियर डिझायनर आहे. तिने करण जोहरची टेरेस तसेच यश आणि रुहीची नर्सरी डिझाइन केली आहे. तिने रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलीन फर्नांडिस या लोकप्रिय कलाकारांच्या घराचे इंटिरियर्स केले आहे.

Story img Loader