ह्रतिक रोशन या पिढीचा सर्वात चर्चेतला अभिनेता आहे. सुझॅनपासून विभक्त झाल्यानंतर तर हृतिक बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींच्याही जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. त्यामुळे त्याने एखाद्या अभिनेत्रीशी चार शब्द बोलायचा अवकाश त्यांच्या एकत्र असण्याची खमंग चर्चा सुरू होते. सध्या अशाच एका खमंग चर्चेमुळे ह्रतिक बेजार झाला असून आपल्या ‘स्टारडम’चा कोणीही गैरफायदा घेऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्याने आपल्या टीमला दिल्या आहेत.
सुझ्ॉनपासून फारकत घेतलेला ह्रतिक आत्तापर्यंत ‘बँग बँग’ चित्रपटात व्यग्र होता. त्यामुळे पहिल्यांदा कतरिनाशी त्याची मैत्री, मग त्यांची जवळीक, त्यामुळे कतरिना-रणबीरचे बिघडलेले संबंध अशा अनेक अफवांना वाटा फुटल्या होत्या. मात्र, ‘बँग बँग’ प्रदर्शित झाला. कतरिनाही ‘जग्गा जासूस’च्या चित्रिकरणासाठी रणबीरकडे परतली. त्यामुळे आता काय?, हा प्रश्न हृतिकपुरता चक्क इशा गुप्ता नामक अभिनेत्रीने सोडवला आणि म्हणूनच ह्रतिकला जबरदस्त धक्का बसला आहे.
त्याचे असे झाले, गेल्या आठवडय़ात दुबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनासाठी ह्रतिक रोशनला आमंत्रित करण्यात आले होते. उद्घाटन झाल्यानंतर निवांत बसलेल्या ह्रतिकसमोर पाहुणी म्हणून उभी राहिली ती इशा. एकाच इंडस्ट्रीत असल्याने इशाला टाळणे शक्य नव्हते. त्यामुळे तिचे स्वागत करून त्याने तिच्याशी गप्पा मारल्या. पण, गप्पा मारतानाच आजूबाजूच्या नजरा आपल्यावरच खिळल्या आहेत हे लक्षात आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या ह्रतिकला धक्का बसला तो त्याचे आणि इशाचे काहीतर सुरू आहे. या बातमीने.
त्या दोघांच्या अफेअरबद्दल झालेली चर्चा कमी होती म्हणून की काय, ह्रतिक आपल्याशी कसं छान बोलला, आपल्याला त्याच्याचबरोबर चित्रपट करायचा आहे अशा सगळ्या गोष्टी इशाने माध्यमांना रंगवून सांगितल्या. वर ह्रतिकचे आणि आपले तसे काही संबंध नाहीत, असा सूचक संदेशही तिने दिला. या सगळ्या गोष्टींमुळे ह्रतिक कमालीचा वैतागला आहे. यापुढे कुठल्याही कार्यक्रमात कोणीही ओळखीचा कलाकार असू दे. त्याने माझ्या प्रतिमेचा गैरफायदा आपल्या प्रसिद्धीसाठी घेता कामा नये, त्यासाठी जे काही करता येईल ते करा.. अशा कडक सूचना आपल्या टीमला दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा