ती आली आणि तिने जिंकलं…जवळपास १० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. एकापाठोपाठ एक अशा तिच्या सात चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कमाईत १०० कोटींचा आकडा पार केला. ‘राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘पद्मावत’ अशा दमदार चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवतानाच तिला काही अपयशसुद्धा पचवावे लागले. अशाच एका अपयशाचा तिला आजही पश्चात्ताप होतो.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘BFFs With Vogue’ या चॅट शोमध्ये बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिकाने तिची बहिण अनिशासोबत हजेरी लावली होती. यावेळी तिने मनमोकळेपणाने गप्पाही मारल्या आणि काही खुलासेसुद्धा केले. करिअरमधला एक असा चित्रपट ज्याची ऑफर स्विकारल्याचा आजही तिला पश्चात्ताप होतो, याबद्दल दीपिका बोलत होती आणि तो चित्रपट होता ‘चांदनी चौक टू चाइना’. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दुहेरी भूमिकेत झळकली होती. निखिल अडवाणी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. म्हणूनच त्या गोष्टीचा पश्चात्ताप होत असल्याचे दीपिकाने म्हटले.

या शोमध्य नेहासोबत साधलेल्या संवादातून दीपिका आणि कतरिनामधील शीतयुद्ध अजूनही संपलेलं नसल्याचं चित्र दिसून आलं. नेहाने जेव्हा तिला विचारले की तुझ्या लग्नाला कतरिना कैफला आमंत्रित करशील का?, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिने साफ नकार दिला. त्यामुळे रणबीर कपूरमुळे निर्माण झालेला या दोघींमधील वाद अजूनही शमला नाही हे स्पष्ट झाले.

Story img Loader