‘अर्थ’, ‘सारांश’, ‘जख्म’ चित्रपटांच्या पटकथा लिहून आपले लिखाणाचे कौशल्य महेश भट यांनी प्रेक्षकांसमोर आणले होते. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर चित्रपट निर्माता महेश भट हे लिखाणाची जादू दाखवणार असून ते त्यांच्या आगामी चित्रपटासाठी पटकथा लिहणार आहेत. ‘विशेष फिल्मस’च्या ‘गॅंगस्टर’, ‘मर्डर ३’, ‘जिस्म २’ या चित्रपटांसाठी महेश यांनी केवळ पटकथेच्या कल्पना दिल्या होत्या. मात्र, आता १४ वर्षांच्या अंतरानंतर ते ‘विशेष फिल्म’साठी पटकथा लिहणार आहेत. एक भावनिक प्रेमकथा असणा-या या चित्रपटात विद्या बालन ही दोन नवीन चेह-यांसोबत दिसेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बॉक्स ऑफीसवर १०० कोटींचा गल्ला जमवणा-या ‘आशिकी २’ चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सदर चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षीअखेरीस सुरु होईल.