ऑलिम्पिकमध्ये महिला मुष्टियुद्ध प्रकारात कास्य पदक मिळवणाऱ्या मेरी कोमवर चित्रपट बनत असून, या चित्रपटात मेरी कोमची भूमिका साकारणारी राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री प्रियांका चोप्राने मेरीच्या इम्फाळ या गावाला भेट दिली.  यावेळी स्वतः मेरी तिच्याबरोबर होती. मेरी कोमच्या कुटुंबीयांनी प्रियांकाचे प्रेमाने स्वागत केले. या भेटीचे अनुभव आणि छायाचित्रे प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहेत.

मेरी कोमवर बनत असलेल्या या चित्रपटात मेरी कोमचा मणिपूरपासून ते मुष्टियुद्धात पाच वेळा विश्वविजेती बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

प्रियांकाचे ट्विटरवरील संदेश  –

 

 

 


पडद्यावरील महिला मुष्टियोद्धा साकारण्यासाठी प्रियांकाने कठोर पशिक्षण घेतले आहे. मेरी कोमचे आयुष्य जवळून जाणून घेण्यासाठी ईशान्य भारतातील मेरीच्या गावी प्रियांका आली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार याचे आहे.

Story img Loader