आजही चित्रपट म्हंटलं की आपल्यासमोर त्यात काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री येतात. आपल्या देशात आजही चित्रपट आणि त्यांचं वायवसायिक यश हे त्यात काम करणाऱ्या कलाकारांवर आणि खासकरून बड्याबड्या स्टार्सवर अवलंबून असतं, पण हॉलिवूडमध्ये मात्र याउलट चित्र पाहायला मिळतं. त्यांच्या चित्रपटाचा मुख्य नायक असतो तो दिग्दर्शक आणि त्या चित्रपटाची कथा. आज आपण हॉलिवूडच्या अशाच एका महागड्या दिग्दर्शकाविषयी जाणून घेणार आहोत.
नुकतंच त्याला उत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला. या दिग्दर्शकाचे नाव म्हणजे क्रिस्तोफर नोलनने. नोलनचा अणूबॉम्बचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर बेतलेला ‘ओपनहायमर’ हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला अन् याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता असे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.
आणखी वाचा : अल्लू अर्जुनबरोबरच्या पुढील चित्रपटासाठी अॅटली कुमारला मिळणार ‘इतके’ मानधन; रक्कम ऐकून व्हाल थक्क
एकाहून एक सरस असे चित्रपट देणारा नोलन हा हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा महागडा दिग्दर्शक आहे. नोलनच्या ‘ओपनहायमर’ने जगभरात जवळपास ८२०० कोटींचा व्यवसाय केला अन् या चित्रपटासाठी नोलनने तब्बल ८२० कोटी इतके मानधन घेतले, यामुळेच हॉलिवूडमधील एक महागडा दिग्दर्शक म्हणून नोलनकडे बघितलं जात आहे. १९९८ मध्ये ‘द फॉलोइंग’ हा स्वतंत्र चित्रपट काढत नोलनने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यावेळी या चित्रपटाचं बजेट २.५ लाख इतके होते, अन् या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० लाखांचा व्यवसाय केला होता.
त्यानंतर आलेल्या ‘मेमेंटो’, ‘इनसॉमनीया’, ‘प्रेस्टीज’ या तीन चित्रपटातून नोलनने त्याची जादू दाखवली. समीक्षकांबरोबरच त्याने प्रेक्षकांवरही मोहिनी घातली. ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’मधील तीनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली अन् नोलन कित्येकांचा लाडका दिग्दर्शक बनला. आपल्या चित्रपटातून केवळ मनोरंजनच नव्हे तर प्रेक्षकांच्या डोक्याला खाद्यही पुरवलं. नोलनच्या गेल्या ८ चित्रपटांनी मिळून आजवर १००० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटांमध्ये ‘इंटरस्टेलर’, ‘टेनेट’, ‘डंकर्क’, ‘इनसेप्शन’सारख्या सुपरहीट चित्रपटांचा समावेश आहे.