सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती चित्रपटसृष्टीत जागतिक स्तरावर मानाचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांची. नुकतीच ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये आतापर्यंत ड्युन या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. पण या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून ५३ वर्षीय ट्रॉय कोत्सुर यांना यंदाचा ऑस्कर देण्यात आला.

ट्रॉय कोत्सुर यांना हा पुरस्कार ‘CODA’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी देण्यात आला. हा पुरस्कार जिंकणाऱ्या ट्रॉय यांनी इतिहास रचला आहे. ते सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर जिंकणारे पहिले कर्णबधिर अभिनेता ठरले. ‘मी आज या मंचावर उभा आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. इथंपर्यंतचा हा प्रवास खरंच रोमांचक होता.’ या शब्दात ट्रॉय कोत्सुर यांनी सांकेतिक भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

आणखी वाचा- Oscars 2022 Live : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेम्स बाँडच्या आठवणींना उजाळा

ट्रॉय कोत्सुर पुढे म्हणाले, ‘हा पुरस्कार मी माझ्या CODA टीमला, कर्णबधिर आणि अपंग समुदायाला समर्पित करतो. हा आमच्यासाठी खूप खास क्षण आहे.’ ट्रॉय कोत्सुर यांनी हा पुरस्कार मागच्या वर्षी ‘मिनारी’ चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणाऱ्या कोरियन अभिनेत्री युह-जुंग-यून यांच्या हस्ते स्वीकारला.

आणखी वाचा- Oscars 2022 : ऑस्कर पुरस्कार म्हणून मिळणारी ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? जाणून घ्या

दरम्यान या आधी पहिला कर्णबधिर महिला कलाकार म्हणून ‘CODA’ या चित्रपटातील ट्रॉय कोत्सुर यांची सहकलाकार मार्ली मॅटलिन यांना १९८७ साली ‘चिल्ड्रेन ऑफ अ लेसर गॉड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर आता ट्रॉय कोत्सुर हे सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर जिंकणारे पहिले पुरुष कलाकार ठरले आहेत.

Story img Loader