अपेक्षाभंग आणि ऑस्कर या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. या दोन्ही बाजूंचा अनुभव यंदाच्या ऑस्करमध्ये सुपरस्टार लेडी गागाने घेतला आहे. ब्लॅक पँथर सुपरहिरोपटातील Shallow गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्कर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मात्र ‘द फेव्हरेट’ चित्रपटाची नायिका ‘ऑलिव्हिया कोलमन’ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गटात तिचा पराभव केला. जर हे दोन्ही पुरस्कार लेडी गागाने पटकावले असते तर एकाच वर्षी २ ऑस्कर पटकावणारी यंदाची ती दुसरी कलाकार ठरली असती.

लेडी गागाने गायिका असतानाही आपल्या अफलातुन अभिनयाच्या जोरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गटात नामांकन मिळवले होते. त्यामुळे आपली आवडती गायिका यंदा दोन ऑस्कर जिंकणारच अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना होती. परंतु ऑलिव्हिया कोलमन समोर तिचा अभिनय फिका पडला आणि शेवटी तिला हार पत्करावी लागली. ही घटना वरकरणी सामान्य वाटत असली तरी लेडी गागाच्या नाराज चाहत्यांनी आपल्या तिखट प्रतिक्रीया सोशल मीडियावर देण्यास सुरवात केली आहे.

Story img Loader