95th Academy Awards 2023 : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठी फारच खास ठरला आहे. ऑस्कर २०२३मध्ये भारताने दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. तर ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ या डॉक्युमेंट्रीनेही बेस्ट डॉक्युमेंट्री फिल्म हा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरील सिताऱ्यांचे फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ बँक हिनेही ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. एलिझाबेथचा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा>> Video: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक, अभिनेत्रीचे डोळे पाणावले अन्…; व्हिडीओ व्हायरल
एलिझाबेथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होत. ग्लॅमरस लूकमध्ये ऑस्करच्या मंचावर अवतरलेल्या एलिझाबेथची मात्र गाऊनमुळे फजिती झाली. गाऊन पायात अडकल्याने सुरुवातीला एलिझाबेथ थोडीशी अडखळली. नंतर पुन्हा गाऊन पायात अडकून अभिनेत्रीचा तोल गेला. पण, तिने वेळीच स्वत:ला सावरल्यामुळे ती पडता पडता वाचली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील एलिझाबेथचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.