95th Academy Awards 2023 : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठी फारच खास ठरला आहे. ऑस्कर २०२३मध्ये भारताने दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग पुरस्कार मिळाला आहे. तर ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ या डॉक्युमेंट्रीनेही ऑस्कर पटकावला आहे.
‘नाटू नाटू’ला पुरस्कार घोषित करण्याआधी या गाण्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने माहिती दिली. यावेळी दीपिकाने आरआरआर चित्रपटाचं कौतुकही केलं. मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ जगभरात पाहायला मिळाली. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला लोकप्रियता मिळाली. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा>> Video: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक, अभिनेत्रीचे डोळे पाणावले अन्…; व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा>> Oscars Awards 2023 : ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळवून देणारे एम एम कीरावनी कोण आहेत?
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ची भूरळ पडली. ‘नाटू नाटू’ गाण्यावर ऑस्करच्या मंचावर पावलं थिरकली. या गाण्यावर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करण्यात आलं. नाटू नाटूच्या हुक स्टेप्सवर कलाकारांची पावलं थिरकताच उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला. या गाण्याला स्टँडिंग ओव्हेशनही मिळाली.
हेही पाहा>> Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष
एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने चाहत्यांना वेड लावलं. राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘नाटू नाटू’चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला.