या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्कर स्पर्धेत दाखल होणाऱ्या चित्रपटांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वैयक्तिक अथवा खासगी कहाण्यांची संख्या वाढत आहे. एरव्ही सर्वच चित्रपटांच्या कहाण्या वैयक्तिक असल्या तरी त्यांना संस्थांचा, समूहाचा अथवा कालाचा संबंध असतो. यंदाच्या चित्रपटांमध्ये ‘अरायव्हल’चा विषय थेट पृथ्वीवासीय आणि परग्रहवासीय यांच्यातील संवादाशी निगडित आहे, ‘फेन्स’ चित्रपटात १९५० सालातील आफ्रिकन अमेरिकी कुटुंबाच्या अनुषंगाने तत्कालीन अमेरिकी समाजव्यवस्था येते. ‘हेल ऑर हाय वॉटर’मधील पाश्र्वभूमी आर्थिक मंदीला समरूप आहे, ‘हॅकसॉरिज’ युद्धपट आहे तर नासाच्या सुरुवातीच्या काळात अंतराळ कार्यक्रमाच्या धुरिणींवर ‘हिडन फिगर्स’ बेतला आहे. या धर्तीवर मियामीतील गुन्हेगारी जगतात एका व्यक्तीचा जन्मापासून ते विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास दाखविणारा ‘मुनलाइट’, भारतात हरविलेले लहानपण शोधायला ऑस्ट्रेलियातून निघालेल्या व्यक्तीची गोष्ट सांगणारा ‘लायन’ आणि आपल्या वैयक्तिक दु:खांचा उत्सव साजरा करायला बोस्टनहून मँचेस्टरमध्ये आलेल्या नायकाची मानसिक कुतरओढ दाखविणारा ‘मँचेस्टर बाय द सी’ या अतिवैयक्तिक कहाण्या आहेत. त्यांचे ऑस्करस्पर्धेत असणे हा या चित्रपटांच्या कर्त्यांचा सन्मान आहे.

‘मँचेस्टर बाय द सी’चा नायक ली चॅण्डलर (केसी अफ्लेक) बोस्टनमध्ये छोटी-मोठी कामे करणारा हरहुन्नरी आहे. कमालीच्या निर्विकारपणे तो हातात येणाऱ्या सर्व गोष्टी उरकतो आणि प्रसंगी बारमध्ये मद्य पिऊन धिंगाणा घालतो. पण त्याच्या या नित्यनेमाने चालणाऱ्या व्यवहारामध्ये एकाएकी खंड पडतो. मँचेस्टरमधील त्याच्या भावाच्या मृत्यूची वार्ता फोनवर येऊन धडकते. नाखुशीने तो मर्तिकाचे विधी उरकण्यासाठी मँचेस्टरमध्ये दाखल होतो. तिकडे थोडय़ाच दिवसांत त्याला भावाच्या सोळावर्षीय मुलाची जबाबदारी भावाने आपल्यावर टाकल्याचे लक्षात येते. कुटुंब आणि नातेसंबंधांहून लांब पडलेला ली वकिलाने मांडलेला हा प्रस्ताव धुडकावतो. मात्र काहीच दिवसांत गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध होण्याच्या वळणांवर येऊन ठेपतात.

मॅँचेस्टरमध्ये आल्यानंतर लीच्या भूतकाळाचा आणि त्याच्या भावासोबतच्या आठवणींचा पडदा उलगडताना त्याच्यात शिरलेल्या निर्विकारपणाचा अंदाज यायला लागतो. केसी अफ्लेक या अभिनेत्याच्या एकटय़ाच्या संयत आणि कणखर अभिनयाच्या बळावर चित्रपटाचे कथानक वेग घ्यायला लागते.

अशा प्रकारच्या चित्रपटांचे हमखास एक वैशिष्टय़ असते की दु:खात बुडालेल्या नायकाच्या आयुष्याचा घडणाऱ्या घटनांनी पूर्णपणे जीर्णोद्धार होतो. त्याच्या मनाविरोधात तो नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वगैरे येतो, असे कथानकामध्ये मांडले जाते. दिग्दर्शक केनिथ लोनरगन याला मात्र इथे नायकाचा जीर्णोद्धार करायचा नाही. दु:खाचा आघात माणसाच्या मनावरून पूर्णपणे पुसला जाऊ शकतो का, कुटुंबापासून हरविलेली व्यक्ती पुन्हा नात्यांच्या जंजाळात अडकण्याऐवजी एकटेपणाला कवटाळते का, हे प्रश्न ‘मँचेस्टर बाय द सी’ला पडले आहेत.

ली याचे आपल्या शहरात पुन्हा पोहोचण्याच्या वार्तेने तेथील लोकांमध्ये होणाऱ्या चलबिचलीतून त्याच्या भीषण भूतकाळाचे रहस्य चित्रपटाच्या सुरुवातीला छानपैकी तयार झाले आहे. शहरात आल्यावर त्याला सोळावर्षीय पुतण्याच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते. तो त्याचे सांत्वन करतो. पण जेव्हा त्याला आपल्या पुतण्याची जबाबदारी अंगावर आलेली असल्याचे कळते, तेव्हा दोघांमध्ये त्रोटक खटके उडू लागतात.

कुटुंबाविषयी कणभरही प्रेम नसलेला ली त्याच्या भूतकाळाच्या फ्लॅशबॅकमध्ये कमालीचा उलटा असलेला पाहायला मिळतो. त्याच्या कुटुंबावर आलेल्या दु:खद प्रसंगातून त्याच्या सद्य:स्थितीतल्या नातेविषयक तिटकाऱ्याचे मूळ कळते. पण त्यातून बाहेर पडण्यात त्याला काडीचीही आवश्यकता भासत नाही. अत्यंत क्रूरपणे आत्मपिडन करत तो दु:खांचा उत्सव साजरा करताना दिसतो.

चित्रपटात एका प्रसंगात पुतण्याच्या मैत्रिणीची आई त्याला बोलते करण्यात पराभूत होण्याचा प्रसंग ट्रॅजिकॉमेडी बनला आहे. निव्वळ हाच नाही तर पुतण्याशी त्याचा चालणारा थंड भावनाहीन संवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये म्हटले तर गांभीर्य आणि पाहिले तर खोचक विनोद दिसू शकतो. भावापासून अनेक वर्षांपासून विभक्त झालेल्या त्याच्या पूर्वाश्रमीच्या ड्रग अ‍ॅडिक्ट पत्नीकडे पुतण्याची जबाबदारी जावी यासाठी ली प्रयत्न करतो. पण त्या घरामध्ये गेल्यानंतर पुतण्याचाही जीव ली याच्यासारखा घुसमटून जातो. खुद्द ली त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीशी नीट बोलू शकत नाही, याचाही एक अपारंपरिक पुनर्भेटीचाही प्रकार येथे पाहायला मिळतो.

प्रेमाचे आयुष्यातील महत्त्व, प्रेम आणि नाते न परतीच्या क्षणांवर गेल्यानंतर पुन्हा आयुष्य पूर्ववत होऊ शकते का, याचा वास्तव अंगाने ‘मँचेस्टर बाय द सी’ शोध घेतो. संयत असूनही दु:खगाथा मांडणाऱ्या कैक रडवेल्या संथ चित्रपटांसारखा तो नाही, हे त्याचे वेगळेपण ऑस्कर स्पर्धेत त्याला घेऊन आले आहे. गोळीबंद पटकथेसह महत्त्वाच्या सहा नामांकनांपैकी किती पुरस्कार तो मिळवेल, हे पुढील आठवडय़ात ठरेल.