काही कारणास्तव चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर झालेल्या नायकाला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी कराव्या लागलेल्या धडपडीची कथा रंगवलेल्या ‘बर्डमॅन’ने यंदाच्या ऑस्करवारीत दणदणीत यश मिळवत तब्बल तीन पुरस्कार प्राप्त केले. सवरेत्कृष्ट चित्रपटाबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन व मूळ पटकथा या तीन श्रेणींसाठी ‘बर्डमॅन’ने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यावर छाप पाडली. सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मात्र स्टीफन हॉकिंग यांची व्यक्तिरेखा रंगवणारा ब्रिटिश अभिनेता एडी रेडमायन याला प्राप्त झाला.
विदेशी चित्रपटांच्या श्रेणीत ‘इदा’ या पोलिश चित्रपटाला ऑस्करचे भाग्य प्राप्त झाले. भारताच्या वाटय़ाला पुन्हा एकदा अपयश आले. भारताकडून ‘लिअर्स डाइस’ या चित्रपटाची शिफारस करण्यात आली होती.
यंदाचा ८७वा ऑस्कर पुरस्कार सोहळा येथे सोमवारी नेहमीच्याच परंपरेत साजरा झाला. अॅलेजांड्रो इनारिटू यांच्या ‘बर्डमॅन’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपट व उत्कृष्ट दिग्दर्शक व मूळ पटकथा हे पुरस्कार मिळाले, तर रिचर्ड लिंकलेटर यांच्या ‘बॉयहूड’ या चित्रपटास त्याने मागे टाकले. यंदा अटीतटीच्या लढतीत ‘बर्डमॅन’ने बाजी मारली, उत्कृष्ट छायालेखनाचा पुरस्कारही या चित्रपटानेच पटकावला आहे.
‘बर्डमॅन’ला एकूण नऊ नामांकने होती. वेस अँडरसन यांचा ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ हा चित्रपटही तोडीचाच होता; पण त्याला मूळ सुरावट वा गाणे, केशभूषा, उत्कृष्ट निर्मिती व वेशभूषा, मेकअप यासाठीचे पुरस्कार मिळाले आहेत.
ब्रिटिश अभिनेता एडी रेडमायन याने ‘बर्डमॅन’ची घोडदौड रोखताना, ख्यातनाम विश्वरचना वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे. ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. ‘बर्डमॅन’चा अभिनेता मायकेल कीटन याने त्याला अटीतटीची लढत दिली, इतर नामांकनांत बेनेडिक्ट कमबरबॅच, ब्रॅडले कूपर व स्टीव्ह कॅरेल यांचा समावेश होता.
ऑस्कर पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणेः
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा