Oscar awards 2019 Live : चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटानं पटकावला आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकून पाच नामांकनं होती त्यातल्या तीन पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’नं आपली मोहर उमटवली आहे. ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर ‘ग्रीन बुक’ नं पटकावला आहे. पीटर फेराली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
यंदाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सर्वोत्तम चित्रपटाच्या शर्यतीत एकूण आठ चित्रपट होते. सुरूवातीपासूनच ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’, ‘रोमा’ , ‘ब्लॅक पँथर’मध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र बाजी ‘ग्रीन बुक’ मारली . ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ या चित्रपटानं प्रत्येकी चार ऑस्कर पटकावले आहे. तर ‘ब्लॅक पँथर’ नं तीन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ चित्रपटात फ्रेडी मर्क्युरीच्या भूमिकेत असलेल्या रॅमी मॅलेकला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर ‘फेव्हरेट’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ओलिविया कोलमनने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. ११ वर्षांनतर पहिल्यांदाच स्पायडरमॅन आणि ब्लॅकपँथर या सुपरहिरोंनी ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘स्पायडरमॅन’ला सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे.
यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता. ‘दी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर १९८९ नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडला आहे.
ऑस्करमध्ये पाच नामांकनं 'ग्रीन बुक'ला मिळाली होती. या चित्रपटानं ३ ऑस्कर पटकावले आहेत .
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर अल्फान्सो क्वारोन यांना रोमा चित्रपटासाठी देण्यात आला आहे. आतापर्यंत त्यांनी ४ ऑस्कर पटाकावले आहेत.
फेव्हरेट चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ओलिविया कोलमनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या गटात ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
'दी बोहेमियन ऱ्हाप्सडी'साठी रॅमी मॅलेकला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कारAnd the #Oscars winner is... pic.twitter.com/Q6DJG2tQYY— The Academy (@TheAcademy) February 25, 2019
अ स्टार इज बॉर्न या चित्रपटाने ओरिजनल साँग या गटात ऑस्कर पटकावला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध गायिका लेडी गागानं मुख्य भूमिका साकारली आहे.
'ब्लॅक पँथर' सुपरहिरोपटाने ओरिजनल स्कोर गटात पुरस्कार पटकावला आहे. 'ब्लॅक पँथर'ने आतापर्यंत पटकावलेला हा तिसरा ऑस्कर आहे.
ग्रीन बुक या चित्रपटाने ओरिजनल स्क्रीनप्ले या गटात ऑस्कर पटकावला आहे. 'दी बोहेमियन ऱ्हाप्सडी', 'रोमा' , 'ब्लॅक पँथर'मध्ये चुरस असली तरी चाहत्यांना ‘ग्रीन बुक’ कडूनही अपेक्षा आहेत. ‘ग्रीन बुक’ ही बडीमूव्ही प्रकारातील पूर्वसुरींसारखी अॅक्शन फिल्म नाही. तिला संदर्भ आहे तो १९६० च्या दशकात हजारो मैलांचा प्रवास करण्यासाठी निकड म्हणून एकत्र यावे लागणाऱ्या दोन व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांचा. दिग्दर्शक पीटर फेराली यांनी त्यात अत्यंत चलाखपणे परस्परविरोधी व्यक्तिरेखांची मैत्रउभारणी रंगवली आहे.
Indian film producer Guneet Monga's 'Period. End of Sentence.' wins #Oscars for Documentary Short Subject. pic.twitter.com/LKxnv9YghG— ANI (@ANI) February 25, 2019
दोन वर्षांपूर्वी 'स्टिव्हन स्पीलबर्ग', 'ख्रिस्तोफर नोलन', 'जेम्स कॅमरून' यांसारख्या अनेक बड्या दिग्दर्शकांनी नेटफ्लिक्सला जोरदार विरोध केला होता. परंतु सर्वांच्या नाकावर टिचून नेटफ्लिक्सच्या 'रोमा' या चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल 10 नामांकने मिळवली. आतापर्यंत त्यातील २ पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटाचा ऑस्कर 'रोमा'ला मिळाला आहे.
२००८ साली 'बॅटमॅन द डार्क नाइट' ऑस्कर पटकावणारा पहिला सुपरहिरोपट होता. त्यांनंतर गेल्या १० वर्षांत कोणत्याच सुपरहिरोपटाला ऑस्करपर्यंत मजल मारता आली नाही. परंतु या वर्षी सुपरहिरोपटांनी ऑस्कर पुरस्कारावर आपली छाप सोडली आहे. आतापर्यंत 'ब्लॅक पँथर'ने तीन व 'स्पायडरमॅन'ने एक असे एकूण तीन ऑस्कर पटकावले आहेत.
डोमी शी आणि बेकी कॉब यांना सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपटाचा ऑस्कर
'ग्रीन बुक'साठी मेहेरशाला अलीला सर्वोत्तम सहअभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
जॉन ओटमन यांना 'दी बोहेमियन ऱ्हाप्सडी'साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलनाचा ऑस्कर मिळाला आहे.
अल्फान्सो क्वारोन हे रोमा चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. मेक्सिकोतून ऑस्करसाठीचं नामांकन मिळणारा हा नववा चित्रपट आहे.
'द फेव्हरिट' आणि 'रोमा' या चित्रपटांना सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी दहा नामांकंनं मिळाली आहेत. त्यामुळे आता कोणाच्या नावावर कोणता पुरस्कार जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
'दी बोहेमियन ऱ्हाप्सडी', 'रोमा' व 'ब्लॅक पँथर'च्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी दोन ऑस्कर जमा झाले आहेत.
'इफ बील स्ट्रीट कुड टाॅक' साठी रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला आहे
ऑस्करसाठी गेलेला हा नेटफ्लिक्सचा पहिला चित्रपट आहे.
सर्वोत्कृष्ट वेशभूषा या विभागातील यंदाचा ऑस्कर मिळाला 'ब्लॅक पँथर' ला मिळाला आहे. रोमा आणि 'द फेव्हरिट' नंतर ब्लॅक पँथरला सर्वाधिक नामांकनं आहेत
https://twitter.com/TheAcademy/status/1099843021674147841
https://twitter.com/TheAcademy/status/1099840673644085248
कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे.