लॉस एंजेलिस : करोनानंतरच्या मनोरंजन समीकरणांनी बदलत असलेल्या ऑस्कर सोहळय़ात यंदाही कुणा एका चित्रपटाला महत्त्वाच्या आणि मानाच्या पुरस्कारांवर तगडे वर्चस्व राखता आले नाही. बहुतांश पुरस्कार विविध चित्रपटांमध्ये विखुरले गेले. बारा आणि दहा मानांकने असलेल्या चित्रपटांना भरीव कामगिरी करता आली नाही, तर तीन मानांकने असलेल्या ‘कोडा’ या चित्रपटाने तिन्ही गटांतील पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या सन्मानावरही नाव कोरल्याने सर्वाना आश्चर्यचकित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदा नेटफ्लिक्सच्या ‘पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२, तर वॉर्नर ब्रदर्सच्या ‘डय़ून’ला १० नामांकने होती. वॉल्ट डिझ्नेच्या ‘वेस्ट साइड स्टोरी’ला बेलफास्ट चित्रपटासह सात नामांकने, तर वॉर्नर ब्रदर्सच्याच ‘किंग रिचर्ड’ला सहा नामांकने होती. नामांकनात नेटफ्लिक्स या नव्या मनोरंजन फलाटाची सर्वात मोठी आघाडी होती. ‘डोण्ट लुक अप’ या विडंबनपटासह नेटफ्लिक्सच्या ‘पॉवर ऑफ डॉग’ला २७ नामांकने मिळाली होती. मात्र या क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या अॅपल टीव्हीने पहिल्या वर्षांतच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळविण्याची किमया करून दाखविली.
गेले काही महिने विविध पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या ‘पॉवर ऑफ डॉग’ आणि पर्यावरण आणि पर्यायी पृथ्वीनाशास कारणीभूत ठरणाऱ्या अमेरिकी शासनाचा काल्पनिक मख्खपणा मांडणारा ‘डोण्ट लुक अप’ हे दोन्ही नेटफ्लिक्सचे चित्रपट ऑस्करचे दावेदार मानले जात होते. ‘डय़ुन’ आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटांचीही चर्चा मोठय़ा प्रमाणावर झाली; पण या सर्व चित्रपटांपेक्षा कमी प्रसिद्धी मिळालेल्या ‘कोडा’ला पुरस्कार मिळाला. ‘रायटिंग विथ फायर’ हा भारतीय खाणाखुणा असलेला माहितीपट अंतिम फेरीत होता. मात्र माहितीपटाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक ‘द समर ऑफ सोल’ला मिळाले.
हारुकी मुराकामी यांच्या कथेवर तयार करण्यात आलेल्या ‘ड्राइव्ह माय कार’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या स्पर्धेतही होता.
कुणाला काय?
येथील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळय़ात ‘डय़ुन’ला तांत्रिक गटासह सर्वाधिक सहा पुरस्कार मिळाले. ‘पॉवर ऑफ डॉग’साठी चित्रकर्त्यां जेन कॅम्पियन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम अभिनेता म्हणून विल स्मिथ यांची ‘किंग रिचर्ड’मधील भूमिकेसाठी निवड झाली, तर जेसिका चेस्टन यांना ‘द आइज ऑफ टॅमी फे’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून सन्मान मिळाला.
विल स्मिथचा फटका..
पडद्यावर परग्रहवासीय ते झॉम्बींना दणके देणाऱ्या विल स्मिथचा पारा सोहळय़ादरम्यानच्या शेरेबाजीमुळे वर गेला. ख्रिस रॉक याने पत्नीबाबत विनोद केल्यामुळे चिडलेल्या स्मिथने थेट व्यासपीठावर प्रेक्षकांशी संवाद साधणाऱ्या ख्रिस रॉकला कानशिलात लगावली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर भाषणात त्याने याबाबत माफी मागितली.
वंचितांचे संचित
जगण्यासाठी परधार्जिणेपणाची विविध टोके गाठणारे कोरियन कुटुंब (पॅरेसाईट्स २०२०), मंदी-आर्थिक संकटात नोकरी गमावून नवगरिबी अनुभवणारा अमेरिकी समूह (नोमॅडलॅण्ड २०२१) आणि तीन मूक-बधिर व्यक्ती असलेल्या घरातील चौथी साधारण व्यक्ती जगाशी संवादाचा सेतू बनत कुटुंबचौरसातील चौथा कोन ठरत असल्याची कथा (कोडा २०२२) या गेल्या तीन वर्षांतील ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधील साम्य काय असेल, तर तिन्ही चित्रपटांतील गोष्ट वंचितांमधील संचित शोधताना दिसते. भव्यदिव्य, प्रायोगिक सोस किंवा कल्पना-वास्तवाची विशेष अनुभूती देणाऱ्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत सहजसाध्या विषय-आशयाचा चित्रपट ऑस्कर अकादमी श्रेष्ठ ठरवत असल्याचा पायंडा पडल्याचेही पाहायला मिळत आहे.
शॉन हेडर या दिग्दर्शिकेने २०१४ मधील एका फ्रेंच सिनेमाचे अमेरिकी रूपांतर ‘कोडा’मध्ये केले आहे. मूळ फ्रेंच चित्रपटात शेतकरी असलेले कुटुंब ‘कोडा’मध्ये मत्स्यशेतीशी संबंधित दाखविले आहे. बडय़ा धेंडांमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योगात तगून जाण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या रॉसी कुटुंबाची ही सरळसाधी गोष्ट. कुटुंब मात्र सर्वासारखे सरळसाधे नाही. चौघांपैकी तिघे जन्मापासून मुके आणि बहिरे. तर शेंडेफळ असलेली १७ वर्षीय रुबी (अमेलिया जोन्स) ही जन्मत:च बोलण्याची आणि ऐकण्याची पूर्ण क्षमता घेऊन आलेली. घराबाहेर ती सगळय़ांशी बोलू-ऐकू शकते. घरात मात्र तिची भाषा संवादाऐवजी खुणाखुणांची आदिम अशी. भावासह नवनव्या शरीरवाचक शिव्यांच्या लाखोल्यांचा दैनिक कार्यक्रमही खुणांमधूनच साकारणारा.
रुबी दररोज पहाटे ३ वाजता गजर लावून बाप आणि भावासह मासेमारीला निघून जाते. तेथूनच शाळेचाही रस्ता पकडते. मत्स्यदर्पामुळे वर्गात हेटाळणीचा विषय बनलेल्या रुबीला शाळेच्या संगीत समूहात प्रवेश मिळतो. काही दिवसांनी तिच्या आवाजातील गुण संगीत शिक्षकाच्या लक्षात येतात. संगीत शिष्यवृत्तीसाठी तिच्या आवाजाला तयार करण्याचा विडा हा शिक्षक उचलतो; पण कुटुंबचौकोनातील अविभाज्य कोन असलेल्या रुबीने कुटुंब सोडून शिकण्यासाठी इतरत्र जाणे म्हणजे त्या कुटुंबाचा संवादासाठी इतर जगाशी मार्ग खुंटणे. रुबीसमोर निर्णय घेण्यासाठी अटळ असलेल्या वळणांवर या कुटुंबाचा एकमेकांशी खुणांनी होणारा संवाद (त्यांच्या खुणांना सबटायटल्स दिली आहेत.), त्यांच्या चर्चा आणि रुबीचा भावनिक आणि मानसिक पातळीवर घडत जाण्याचा प्रवास म्हणजे ‘कोडा’ हा चित्रपट.
संपूर्ण सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देणारे म्हणून काही चित्रपट असतात. त्यात या चित्रपटाचा समावेश करता येईल. एका बाजूला स्पीलबर्ग, पॉल थॉमस अॅण्डरसन या दिग्गजांचे महासिनेमा स्पर्धेत असताना खर्चाच्या आणि कलाकारांच्या दृष्टीनेही बेताचीच बेगमी असताना, ‘कोडा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळणे, ही जगभरच्या सिनेप्रेमींना धक्कादायक बाब होती.
या चित्रपटातील रुबी या व्यक्तिरेखेवर आई-वडिलांना गुप्तरोगतज्ज्ञाकडे नेण्याची वेळ येते. एवढेच नाही तर डॉक्टरने सांगितलेल्या बाबी खुणांद्वारे आई-वडिलांना सांगण्याच्या विचित्र अवस्थेतूनही तिला जावे लागते. वडिलांच्या शिव्या सार्वजनिक सभांत खुणेद्वारे भाषेत रूपांतरित करताना तिची उडणारी तारांबळ आणि निर्माण होणारा विनोद या गोष्टी अगदी नैसर्गिकरीत्या वठल्या आहेत. हा चित्रपट स्वच्छंदी आई-बापाच्या पोटी जन्मलेल्या मुलीची गोष्ट अपेक्षित वळणांवर नेऊन सोडतो; पण तरीही त्या व्यक्तिरेखा आपल्याला अनेक हळव्या क्षणांचे साक्षीदार बनवतात.
सोहळय़ात युक्रेन युद्धाचे पडसाद
लॉस एंजेलिस : ऑस्कर पुरस्काराच्या व्यासपीठावर जागतिक घडामोडींची दखल घेतली जाण्याची दीर्घकालीन परंपरा आहे. यंदाच्या सोहळय़ातही रशियाचे युक्रेनवरील आक्रमण हा हॉलीवूडमधील अनेक मान्यवरांसाठी महत्त्वाचा विषय होता. अनेकांनी आघाडीवरील युक्रेनी नागरिकांना पािठबा दिला. दुसरीकडे सोहळा संपेपर्यंत युक्रेनचा उल्लेख न करता युद्धबळींना ‘श्रद्धांजली’ वाहिल्याबद्दल आयोजकांवर संताप व्यक्त झाला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना समारंभात भावना व्यक्त करण्याची संधी अकादमीने नाकारली तर मी माझी ऑस्कर सन्मानचिन्हे जाहीरपणे वितळवून टाकेन, असा इशारा प्रख्यात अभिनेते शॉन पेन यांनी दिला होता.
अनेक अभिनेत्यांनी युक्रेन आणि निर्वासितांच्या समर्थनार्थ निळय़ा फिती परिधान केल्या होत्या. निळय़ा फितींवर ‘विथरेफ्युजी’ असा हॅशटॅग होता.
संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मान्यवरांना निळय़ा फिती दिल्या होत्या. मूळ युक्रेनियन वंशाच्या मिला कुनीस या अभिनेत्रीने भाषणात युक्रेनमधील नागरिकांच्या धाडसाचे, स्थितप्रज्ञतेचे कौतुक केले. अकादमीने सोहळय़ादरम्यान युक्रेनमधील युद्धाविषयी व्यासपीठाच्या पडद्यावर युक्रेनमधील नागरिकांना मदतीची गरज असल्याचे एक निवेदन प्रदर्शित केले. सोहळा संचालिका अॅमी शुमर हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी युक्रेनमधील युद्धावर ओझरते पण ठाम भाष्य केले. युक्रेनमध्ये नरसंहार सुरू आहे. महिलांसह अन्य नागरिक त्यांचे सर्वस्व गमावत आहेत, असे ती म्हणाली.