Oscar 2023 Updates in Marathi : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.
पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Oscars Awards 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखले जातो. यंदाचा ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आता 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ' द एलिफंट व्हिस्परर्स 'ने बाजी मारली आहे.
त्यापाठोपाठ आता 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले या श्रेणीत डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने हजेरी लावली. या सोहळ्यातील तिचा लूकने लक्ष वेधून घेतलं आहे.
बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स यांना यंदाचा या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे.
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारतातून नामांकन मिळालेल्या ' द एलिफंट व्हिस्परर्स'ने बाजी मारली आहे.
'ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. अर्जेंटीना 1985, क्लोज, ईओ आणि द क्वाइट गर्ल हे चित्रपटही या पुरस्काराच्या शर्यतीत होते.
दरवर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात एका खास पद्धतीने केली जाते. नुकतंच याचा व्हिडीओ समोर आला आहे.
बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटात आपले नाव गाजवणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दाखल झाली आहे. यावेळी तिने आरआरआर चित्रपटाची माहिती दिली. त्याबरोबर तिने 'नाटू नाटू' गाण्याचे कौतुकही केले
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार 'वाकांडा फॉरएव्हर'साठी रुथ कार्टरला मिळाला.
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी देण्यात येणारा ऑस्कर 'द वेल'ला मिळाला आहे.
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
जेम्स फ्रेंडला त्याच्या 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' चित्रपटातील अतुलनीय कामासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म या ऑस्कर श्रेणीत 'आयरिश गुडबाय' या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला आहे.
अभिनेत्री जेमी ली कर्टिस यंदाचा ९५ व्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 'Everything Everywhere All at Once' या चित्रपटातील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
अभिनेता के हुई क्वानला यंदाचा ९५ व्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 'Everything Everywhere All at Once' या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील पहिला पुरस्कार जाहीर
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - पिनोकियो (Pinocchio)
Oscars Awards 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखले जातो. यंदाचा ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आता 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.