95th Academy Awards 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास आहे. कारण ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. यंदा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली, अभिनेता ज्युनिअर एनटीआर व राम चरण ऑस्कर सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. या सोहळ्यातील त्यांच्या लूक समोर आला आहे. ऑस्करसाठी राम चरण व ज्यु. एनटीआरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास लूक केला आहे. तर या सोहळ्यातील राजामौलींच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा>> ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेत्यांची नावं शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त का ठेवली जातात? जाणून घ्या विशेष कारण
राजामौलींनी ऑस्करसाठी खास देसी लूक केला आहे. पांढरे धोतर व गुलाबी रंगाचा कुर्ता अशा पारंपरिक पेहरावात राजामौली ऑस्कर सोहळ्यात दिसून आले. ऑस्कर सोहळ्यातील राजामौलींच्या या लूकचा फोटो आरआरआरच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ऑस्कर सोहळ्यातील त्यांचा खास लूक चर्चेत आहे.
राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट २४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यु. एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगभरात डंका वाजवला होता. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे.