95th Academy Awards 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. दरवर्षी सर्वांचंच लक्ष या पुरस्कार सोहळ्याकडे लागलेलं असतं. यंदा ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मने आणि ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने भारतासाठी ऑस्कर पटकावला. आता त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परंतु ज्यांना हा पुरस्कार मिळू शकलेला नाही त्यांना इथे निराश केलं जात नाही.
काही मुख्य श्रेणीत नामांकन मिळालेल्या प्रत्येकाला एक खास गिफ्ट हॅम्पर दिलं जातं. या हॅम्परची किंमत लाखोंच्या घरात असते. हे हॅम्पर लॉस एंजलिस येथील ‘डिस्टिंक्टिव्ह असेट्स’ ही कंपनी २००२ पासून देत आहे. यावर्षीच्या हॅम्परची किंमत तब्बल १ लाख २६ हजार डॉलर्स आहे.
आणखी वाचा : Oscar Awards 2023: ‘नाटू नाटू’ने जिंकला पुरस्कार; भारताला पहिल्यांदाच गाण्याने मिळवून दिला ऑस्कर
यावर्षीच्या या हॅम्परमध्ये ६० प्रकारच्या गोष्टी असतील. यात अनेक महागड्या ब्रँड्सचे गिफ्ट व्हाउचर्स, विविध ब्युटी आणि लाईफस्टाईलशी संबंधित वस्तू, विविध खाद्यपदार्थ, चॉकलेट्स, मिठाई, पेटा ब्रँडची प्रवासात उपयोगी येणारी ऊशी, अनेक बड्या ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट ऑफर्स, इटलीचं लाईट हाऊस आणि ऑस्ट्रेलियाच्या बेटावर मोफत ट्रिप, कॅनडाच्या आलिशान इस्टेटमध्ये राहण्याची संधी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
हेही वाचा : Oscar Awards 2023 Live : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘RRR’ने रचला इतिहास, ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘ऑस्कर’ पुरस्कार
हे गिफ्ट हॅम्पर ऑस्करचे सूत्रसंचालक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीत नामांकन झालेल्या सर्वांना दिलं जाणार आहे.