Oscars Awards 2024 : ऑस्कर २०२४ सोहळ्याची दमदार सांगता झाली आहे. दरवर्षी जगभरातील चित्रपटप्रेमी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर हा सोहळा दिमाखात पार पडला असून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन चौथ्यांदा जिमी किमेल याने केलं. या सोहळ्यात सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी वाचा…
ऑस्कर २०२४ सोहळ्यातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एमी स्टोनला मिळाला. 'पूअर थिंग्ज'मधील तिच्या अभिनयासाठी ३५ वर्षीय अभिनेत्रीने प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.
ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपेनहायमर’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
ख्रिस्तोफर नोलनने 'ओपेनहायमर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कार जिंकला.
सिलियन मर्फीने 'ओपेनहाइमर'मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला आहे.
'बार्बी' या चित्रपटातील 'व्हॉट वॉज आय मेड फॉर?' या गाण्यासाठी बिली इलिशने सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर जिंकला.
Ludwig Göransson ला 'ओपनहायमर' साठी या वर्षीचा सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
'द झोन ऑफ इंटरेस्ट' ने ऑस्कर २०२४ मध्ये आणखी एक पुरस्कार जिंकला. त्याला सर्वोत्कृष्ट साउंडचा पुरस्कार मिळाला.
'द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर'ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकला.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर 'ओपनहायमर' चित्रपटाला मिळाला आहे.
२० डेज इन मारियुपोलने या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फील्मचा ऑस्कर जिंकला.
'द लास्ट रिपेअर शॉप'ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टफिल्मचाऑस्कर मिळाला. याचे दिग्दर्शन बेन प्राऊडफूट आणि क्रिस बॉवर्स यांनी केले होते.
'ओपनहायमर'ला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
'गॉडझिला मायनस वन' ला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर मिळाला!
रॉबर्ट डाउनी ज्युनियरला 'ओपेनहायमर'मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.
युनायटेड किंगडमने 'द झोन ऑफ इंटरेस्ट'साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ऑस्कर जिंकला.
रेसरल जॉन सीना नग्नावस्थेत ऑस्करच्या मंचावर पोहोचला. तो सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनच्या अवॉर्डची घोषणा करण्यासाठी अनोख्या अंदाजात मंचावर आला होता.
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी 'पुअर थिंग्ज' ची डिझायनर होली वॉडिंग्टनला ऑस्कर देण्यात आला.
'पुअर थिंग्स'ला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट केशभुषा आणि मेकअपसाठी 'पुअर थिंग्ज' ला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
कॉर्ड जेफरसन लिखित 'अमेरिकन फिक्शन'ने सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार जिंकला.
जस्टिन ट्रायट आणि आर्थर हरारी यांना 'ॲनाटॉमी ऑफ अ फॉल'साठी सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे.
'द बॉय अँड द हेरॉन'ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. याचे दिग्दर्शन हायाओ मियाझाकी आणि तोशियो सुझुकी यांनी केले होते.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार 'वॉर इज ओव्हर' या चित्रपटाचा मिळाला.
दा'वाइन जॉय रँडॉल्फने 'द होल्डओव्हर'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला आहे. पुरस्कार स्वीकारताना ती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
ऑस्कर सोहळ्याची दमदार सुरुवात झाली आहे. ओपनहायमर या ब्लॉकबस्टर चित्रपटाला एकूण १३ नामांकने मिळाली आहेत. याशिवाय ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांचीही यंदाच्या सोहळ्यात चर्चा आहे.