रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष दिग्दर्शित भारतीय माहितीपट ‘रायटिंग विथ फायर’ला ९४ व्या ऑस्कर अकादामी पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचरचं नामांकन मिळालं आहे. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला एकमेव भारतीय माहितीपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचरसाठी ‘रायटिंग विथ फायर’सोबतच ‘असेंशन’, ‘एटिका’, ‘फ्ली’ आणि ‘समर ऑफ द सोल’ या माहितीपटांनाही नामांकन मिळालं आहे.

कोणत्या विषयावर आधारित आहे ‘रायटिंग विथ फायर’

Daron Acemoglu Simon Johnson, and James Robinson Awarded 2024 Nobel Prize
वसाहतवाद, विकास आणि विषमतेच्या इतिहासातून भविष्याकडे…
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Nobel Prize
विश्लेषण: ‘नोबेल’ नाही, पण… विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘हे’ पुरस्कारही प्रतिष्ठेचे… अनेक भारतीय ठरलेत विजेते!
supreme court Tightening the law on child pornography
यूपीएससी सूत्र : चाइल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन् ‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासक्रम, वाचा सविस्तर…
nobel prize 2024
नोबेल पारितोषिक विजेत्यांची निवड कशी केली जाते? कोणत्या क्षेत्रांसाठी दिले जातात पुरस्कार?
women employees ratio in indian companies reached 36 6 percent in current year
विश्लेषण : भारतीय महिलांचा टक्का वाढतोय ?
article about fabless semiconductor manufacturing history of the fabless industry
चिप-चरित्र : ॲपल टीएसएमसी : एक विजयी संयोग
airtel ai based network solution on spam
एअरटेलने सादर केली भारतातील पहिली AI आधारित नेटवर्कची स्पॅम शोध प्रणाली: ग्राहकांना मिळणार रीअल-टाइम अ‍ॅलर्ट्स!

‘रायटिंग विथ फायर’ हा माहितीपट दलित स्त्रियांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘खबर लहरिया’ वृत्तपत्रावर प्रकाश टाकतो. या वृत्तपत्राची सुरुवात २००२ मध्ये दिल्लीतील निरंतर या एनजीओनं बुंदेलखंडच्या चित्रकूट येथे केली होती. ‘रायटिंग विथ फायर’मध्ये ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राचा प्रिंट ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या माहितीपटात मीरा आणि तिच्या सहकाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. ज्या पुरुषप्रधान संस्कृती विरोधात आवाज उठवतात, पोलीस दलाची अक्षमता तपासतात आणि जात, लैंगिक अत्याचार पीडितांबाबत लिहितात.

परदेशात या माहितीपटाबद्दल काय बोललं जातंय?

‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाबद्दल बोलताना फेमिनिस्ट आयकॉन ग्लोरिया स्टीनम यांनी ‘वास्तव आयुष्य’ असं म्हणत या माहितीपटाचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, ‘भारत माझं दुसरं घर आहे. माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी दोन वर्ष तिथे राहिले आहे. आम्ही (अमेरिका आणि भारत) जगातील दोन सर्वात मोठी आणि सर्वात वेगळी प्रजासत्ताक राष्ट्रं आहोत. आम्हाला एकमेकांची गरज आहे आणि एकमेकांकडून शिकण्याची गरज आहे.’

एका हॉलिवूड पत्रकारानं लिहिलं, ‘हा माहितीपट पाहताना आपण स्वतःच या माहितीपटातील पत्रकारांसोबत ग्राउंड रिपोर्टिंग करत असल्याचा भास होतो.’ याशिवाय वॉशिंगटन पोस्टनं ‘सर्वात प्रेरणादायी पत्रकारिता फिल्म’ असं म्हणत या माहितीपटाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान या अगोदर ‘रायटिंग विथ फायर’चं २०२१मध्ये सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता. या फेस्टिव्हलमध्ये या माहितीपटानं ‘द ऑडियन्स अवॉर्ड’ आणि ‘स्पेशल ज्यूरी अवॉर्ड’ जिंकले होते. आतापर्यंत या माहितीपटानं २० पेक्षा जास्त आंतराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.