२०२३ हे वर्षं मनोरंजनसृष्टीसाठी फारच लाभदायक ठरलं. याचदरम्यान भारतीय संगीतकाराला पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एमएम कीरावनी यांना एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला अन् साऱ्या भारतीयांचं उर अभिमानाने भरून आलं. यानंतर सर्वत्र एमएम कीरावनी आणि त्यांच्या कामाचीच चर्चा होऊ लागली.

अगदी यंदाच्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’मध्येही एमएम कीरावनी यांनी हजेरी लावली अन् सिनेरासिकांशी संवाद साधला. यावेळी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेलदेखील तिथे उपस्थित होते. गेली कित्येक वर्षे ते या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करत आहेत अन् या माध्यमातून वर्ल्ड सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम ते करत आहेत.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

आणखी वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ येणार ओटीटीवर; प्रेक्षकांना पाहायला मिळणार अनकट व्हर्जन

याच चित्रपटमहोत्सवात यंदा ऑस्कर विजेत्या एमएम कीरावनी यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना ऑस्कर स्वीकारताना त्यांच्या नेमक्या काय भावना होत्या असा प्रश्नही केला. त्यावेळी ते अक्षरशः सुन्न झाले होते असं एमएम कीरावनी यांनी उत्तर देत स्पष्टीकरण दिलं. इतकंच नव्हे तर एमएम कीरावनी यांनी ज्येष्ठ संगीतकार व गायक सुधीर फडके यांचं एक लोकप्रिय मराठी गाणंदेखील सगळ्यांसमोर सादर केलं.

या कार्यक्रमात एमएम कीरावनी यांनी सुधीर फडके यांनी गायलेलं व संगीतबद्ध केलेलं आणि ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं ‘तोच चंद्रमा नभात’ हे गाणं सादर केलं. त्यांच्या या गाण्याने कित्येकांची मनं जिंकली. एमएम कीरावनी यांना बाबूजी यांचं गाणं सादर करताना पाहून तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक तसेच खुद्द डॉ.जब्बार पटेलदेखील भावुक झाले. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून संगीताला भाषा, प्रांत, राज्य, देश यापैकी कसलीही बंधनं नसतात ही गोष्ट सिद्ध झाली आहे.

Story img Loader