Lee sun kyun Found Dead: २०२० साली ‘पॅरासाइट’ हा कोरियन चित्रपट ऑस्करमुळे चांगलाच चर्चेत होता, उत्तम दिग्दर्शन, उत्तम पटकथा, उत्तम फॉरेन फिल्म आणि उत्तम चित्रपट असे चार ऑस्कर त्यावेळी ‘पॅरासाइट’ने पटकावले. आता या चित्रपटातील कलाकाराबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्रपटात पार्क-डोंग इक हे महत्त्वाचं पात्र साकारणाऱ्या ली सन-क्यून या अभिनेत्याचा मृतदेह बुधवारी सापडला आहे.

‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार दक्षिण कोरियामधील सोल शहरात एका पार्किंग लॉटमध्ये ली सन-क्यूनचा मृतदेह आढळला आहे. गेल्या काही दिवसांपासून ली सन-क्यून हा अवैध ड्रग्जचे सेवन करण्याच्या प्रकरणात अडकला होता ज्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. यामुळे तो चांगलाच चर्चेत होता. या प्रकरणामुळेच त्याने स्वतःला संपवलं असल्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे.

nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
हॉटेलच्या आवारात मोटारीखाली सापडून बालकाचा मृत्यू
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
thane garbage collector sleeping on footpath killed by car
पदपथावर झोपलेल्या कचरा वेचकाच्या शरिरावरून मोटार गेल्याने मृत्यू
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
Petrol theft suspect, Murder of youth Narhe area,
पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाचा खून करणारा माजी उपसरपंच गजाआड

आणखी वाचा : प्रभासच्या ‘सालार’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटे? निर्मात्यांनी हटवल्या सोशल मीडियावरील पोस्ट? नेमकं सत्य जाणून घ्या

या प्रकरणात आपली बाजू मांडताना एका नाइट क्लबमध्ये चुकून ड्रग्ज घेतल्याचं ली सन-क्यूनने कबूल केलं होतं. या प्रकरणात तो दोषी नसल्याचं दावा तो करत होता. २७ डिसेंबरला त्याचा मृतदेह स्वतःच्याच कारमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मरण्याआधी त्याने एक पत्र लिहिल्याचं त्याची पत्नी योनहॅपला मिळालं अन् तिने आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच तातडीने पोलिसांत याबद्दल खुलासा केला आहे.

अद्याप ली सन-क्यूनने त्या पत्रात नेमकं काय लिहिलं आहे याचा खुलासा झालेला नाही. शिवाय हि आत्महत्या आहे की आणखी काही याबद्दलही कुठलं विधान किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ली सन-क्यूनचा जन्म १९७५ मध्ये झाला होता. ‘पॅरासाइट’मध्ये त्याने श्रीमंत वडिलांची भूमिका निभावली होती. तसेच ‘हेल्पलेस’, ‘ऑल अबाऊट माय वाइफ’ या काही प्रसिद्ध प्रोजेक्टमध्येही त्याने काम केले होते.

Story img Loader