चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर अनपेक्षितपणे ‘ग्रीन बुक’या चित्रपटानं पटकावला आहे. ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ या चित्रपटामध्ये चुसर पाहायला मिळली होती मात्र अनपेक्षितपणे ‘ग्रीन बुक’नं बाजी मारली. या शर्यतीत सर्वाधिक मानांकन मिळालेला ‘दी फेव्हरेट’ हा चित्रपट मात्र मागे पडला.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी

ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट चित्रपट
ओरिजनल स्क्रीनप्ले
सर्वोत्कृष्ट सहअभिनेता

‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रॅमी मॅलेक
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटींग

रोमा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी

‘ब्लॅक पँथर’
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
ओरिजनल स्कोअर

दी फेव्हरेट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ओलिविया कोलमन

स्पायडरमॅन : इन टू द स्पाइडर वर्स
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट

Story img Loader