८९व्या ऑस्कर पुरस्काराचे नामांकन जाहीर झाले आणि साऱ्या जगातील सिनेमा वेड्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ‘लाला लँड’ या चित्रपटाला एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्तम चित्रपट निर्मिती, सर्वोत्तम वेशभूषा’ या विविध गटातील तब्बल चौदा पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. ‘लाला लँड’ हा आजवरच्या ‘ऑस्कर पुरस्कार’ ईतिहासातील तिसरा चित्रपट आहे, ज्याला चौदा नामांकने मिळाली आहेत. तत्पूर्वी हा पराक्रम १९६९ साली “ऑल अबाउट इव्ह” आणि १९९७ साली “टायटॅनिक” या चित्रपटांनी केला होता. या चित्रपटाची कथा ‘डॅमियन चॅझेल’ यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“लाला लँड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले या गोष्टीवर माझा जणू विश्वासच बसत नाही, मला व माझ्या सहकाऱ्यांना हा आश्चर्याचा सुखद धक्का आहे” अशा काहीशा शब्दात या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
“ऑस्कर” हा सिनेक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सिनेक्षेत्रावर लिहिणारी नियतकालिके आणि जगभरातील सिनेमेवेडी प्रेक्षकमंडळी जवळ जवळ संपूर्ण जगच या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष ठेऊन असतात. एखादी जगावेगळी कथा, उत्कृष्ट अभिनय आणि संवाद, नवनवीन तंत्रज्ञान, जबरदस्त संगीत आणि अफाट मेहनत घेऊन तयार केलेल्या अफलातून चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळते. निवडलेल्या उत्कृष्ट चित्रपटांतून सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार प्रदान केला जातो. १६ मे १९२९ साली अमेरिकेतील हॉलिवूड शहरात रुझवेल्ट हॉटेलमध्ये केवळ २७० व्यक्तींच्या उपस्थितीत पहिल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन झाले होते. आज या घटनेला ७७ वर्षे झाली आणि त्यानंतर या पुरस्काराची व्याप्ती आणि महत्व उत्तरोत्तर प्रचंढ वाढत गेले. आता तर २०० हून अधिक देशांत या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाते.
“अॅण्ड दी अवॉर्ड गोज टू….” हे शब्द कानावर पडले की जगभरातील हदयं एकाचवेळी धडधडायला लागतात. श्वास रोखले जातात. अनेक मात्तबर कलाकारांना ऑस्करसाठी नामांकन मिळते यातील जवळ जवळ प्रत्येक कलाकाराने जगभरातील पुरस्कार मिळवलेले असतात. दांडगा अनुभव, कतृत्व, अफाट प्रसिद्धी यांच्याकडे असते. पण, ऑस्कर मिळण्यासारखे सुख नाही असे यांना वाटते. आयुष्यात किमान एकदातरी ‘ऑस्कर’ मिळावा ही मनीशा मनात बाळगून आयुष्यभर अभिनयाची तपश्चर्या ही कलाकार मंडळी करत असतात. यावरुनच ऑस्कर पुरस्काराचा दबदबा आपल्या ध्यानात येतो.
ज्या प्रमाणे निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याचे अंदाज वर्तवले जातात त्याचप्रमाणे कोणता कलाकार, कोणता चित्रपट ऑस्कर जिंकणार याचे तज्ज्ञ मंडळी अंदाज वर्तवत असतात. काही पुरस्कार अपेक्षित असतात तर काही अनपेक्षितपणे पुरस्कारावर आपले नाव कोरतात. कानामागून आली अन् तिखट झाली हा प्रत्यय दरवर्षी आपल्याला ऑस्कर पुरस्कारात येताना दिसतो. तसाच काहीसा अनुभव याही वेळेला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ‘लाला लँड’ हा चित्रपट ऑस्कर नामांकन मिळवेल असे तज्ज्ञांना अपेक्षित नव्हते. पण मात्तबर चित्रपटांच्या नाकावर टिचून १४ विविध श्रेणीत या चित्रपटाने नामांकने मिळवली.
चित्रपटाची कथा
“लाला लँड” या शब्दाचा अर्थ स्वप्नांचे जग असा आहे. दिग्दर्शक डॅमियन चॅझेल यांनी स्वत: चित्रपटाच्या कथेचे लिखाण केले आहे. रेयान गॉसलिंग, एमा स्टोन, जॉन लीजेंड, रोजमरिन डेवीट या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनयाचा नमुना या चित्रपटातून सादर केला आहे. चित्रपटाचे संगीत ‘जस्टीन हरवीट्स’ यांनी तयार केले आहे. हा संगीत प्रणय चित्रपट आहे. अलिकडच्या काळातील सर्वात उत्कृष्ट संगीत चित्रपट म्हणून याने नावलौकिक मिळवले आहे. यामागे जस्टीन हरवीट्स यांची अफाट मेहनत आणि जिद्द दिसून येते.
कथाकाराने चित्रपट कथेत विशेष बौधिक कसरती न करता अगदी साधे सरळ कथालेखन केले आहे. चित्रपटातील नायक, नायिका ‘मीया’ आणि ‘सबैश्चियन’ एक प्रसिद्ध कलाकार होण्याची इच्छा मनात बाळगून ‘लॉस एंजिलिस’ शहरात येतात दरम्यान दोघांची भेट होते, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यानंतर स्वत:च्या स्वप्नांच्या दिशेने त्यांची झालेली धावपळ, दरम्यान आलेले उतार चढाव आणि त्यांच्यावर मात करत लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी दाखवलेली जिद्द यांचे सुरेख चित्रीकरण चित्रपटात आहे. शिवाय चित्रपटातील संगीत अफलातून असून ते थेट प्रेक्षकांच्या हृदयाला साद घालते. उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी आणि जबरदस्त संवाद यांच्यासह एक नवीन इतिहास रचण्यासाठी “लाला लँड” हा चित्रपट सज्ज आहे.
“मेरिल स्ट्रीप” एक मोठे आव्हान
‘लाला लँड’ हा कितीही चांगला चित्रपट असला तरी त्यांनाच ऑस्कर मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही. कारण ऑस्कर म्हणजे दर्जेदार चित्रपटांची जत्रा होय. येथे एखादा शेर तर दुसरा सव्वाशेर असतो. ‘मेरिल स्ट्रीप’ हे या जत्रेतील एक आकर्षण केंद्र आहे. कारण या अभिनेत्रीने एक दोन वेळा नव्हे तर तब्बल २० वेळा उत्कृष्ट अभिनेत्री या मानासाठी ऑस्कर नामांकन मिळवले आहे. तिचा ‘फ्लोरेंस फोस्टर जेंकिन्स’ हा देखिल मनावर मोहिनी घालणारा चित्रपट आहे. ‘सोफीस चॉईस’, ‘द आयर्न लेडी’, ‘क्रॅमर वर्सेस क्रॅमर’ या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ३ वेळा पटकवण्याचा पराक्रम ‘मेरिल स्ट्रीप’ने केला आहे आणि आता ती चौथा ऑस्कर जिंकण्यासाठी सज्ज आहे. ‘अरायव्हल’ आणि ‘मूनलाईट’ या चित्रपटांनीही प्रत्येकी ८ नामांकने मिळवली आहेत. शिवाय ‘मॅंचेस्टर बाय द सी’, ‘लायन’, ‘फेन्सेस’, ‘हेल ऑर हाय वॉटर’, ‘हिडन फिगर्स’ आणि ‘हॅकसॉ रिज’ हे चित्रपट देखिल ऑस्करच्या शर्यतीत आहेत. या पार्श्वभूमीवर “लाला लँड” काय चमत्कार करतो हे पाहण्यासारखे आहे.
मंदार गुरव
mandar.gurav@loksatt.com