‘एल’ चित्रपट पाहण्यासाठीची कारणे अनेक आहेत. टोटल रिकॉल, बेसिक इन्स्टिंक्ट, रोबोकॉप आणि हॉलोमॅनसारखे हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील सिनेमा बनविणाऱ्या पॉल व्हरहोवेन या दिग्दर्शकाचा हा फ्रेन्च सिनेमा आहे. गोल्डन ग्लोबमध्ये सवरेत्कृष्ट परभाषिक चित्रपटाचा पुरस्कार पटकावत त्याने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळवला आहे. इझाबेल हुपेअर या साठी पारच्या अभिनेत्रीने पन्नाशीतल्या व्यक्तिरेखेची भूमिका वठवली आहे आणि तरी ती चाळिशीतली दिसली आहे. याशिवाय गेल्या काही दशकांत हाणामारी करणाऱ्या उघड स्त्रीवादी व्यक्तिरेखांद्वारे हॉलीवूडने सबल महिलांचे जे चित्रपट बनवून जगभरात यशस्वीरीत्या खपवले, त्या सर्व चित्रपटांतील स्त्रीवादाला गारद करणारे असे कठोरोत्तम स्त्रीरूप या चित्रपटात तयार करण्यात आले आहे. हा चित्रपट ऑस्करमध्ये परभाषिक चित्रपट गटात नामांकन मिळवू शकला नसला, तरी सर्व इंग्रजी चित्रपट असलेल्या सर्वोत्तम अभिनेत्रीच्या गटात इझाबेल हुपेअर दावेदारासारखी धडकली आहे. फ्रेन्चमधील फिलिपे जाँ या लेखकाच्या २०१२मध्येच आलेल्यो ‘ओह’ या कादंबरीचा हा चित्रपटरूपी अनुवाद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हॉलीवूडमध्ये मारधाड करणाऱ्या उग्र नायिकांची कमतरता लक्षणीयरीत्या भरून काढली ती उमा थर्मनने (किल बील). तिच्या खालोखाल अँजेलिना जोली (टुम्ब रायडर), हिलरी स्वँक (मिलियन डॉलर बेबी), स्कार्लेट जोहान्सन (ल्यूसी) जेनिफर लॉरेन्स(हंगर गेम) यांच्यासोबत डझनभर अभिनेत्रींची नावे घेता येतील. पण केवळ निर्विकारतेचा मुखवटा डकवून मारधाड केली की स्त्री सक्षमता प्रगट होत नाही. त्यामुळेच हेलन मिरन (क्वीन) आणि मेरिल स्ट्रीप यांच्या कणखर, खंबीर अभिनयाला सर्वाधिक किंमत आहे. फ्रेन्च चित्रपट असला तरी ‘एल’मधील नायिकेच्या आधारे इझाबेल हुपेअर हिने हॉलीवूड नायिकांच्या कणखरतेची सीमा विस्तारली आहे.

‘एल’मधील मुख्य व्यक्तिरेखा आहे मिशेल (हुपेअर) ही व्हिडीओगेम कंपनीची मालक असलेली यशस्वी महिला. चित्रपटाच्या सुरुवातीची दृश्यफीत भल्यामोठय़ा घरात शिरलेल्या मुखवटाधारी व्यक्तीने तिच्यावर केलेल्या बलात्काराच्या प्रसंगाने होते. क्षणापुरती हतबल झालेली मिशेल त्यानंतर थोडय़ाच वेळात आपल्या दैनंदिन कामात गढलेली दिसते. पण बलात्काऱ्याला (तो पुन्हा आलाच तर) धडा शिकविण्यासाठी ती विविध आयुधे गोळा करताना दिसते. त्यानंतर लक्षात येते ती तिची गडगंज श्रीमंती आणि प्रस्थापित केलेले विचित्र नातेसंबंध.

तिला एक मुलगा आहे, जो तिच्यामर्जीविरोधातील मुलीसोबत सूत जुळवून बसला आहे. तिचा घटस्फोटित नवरा हा लेखनकारकीर्द उसवलेला असला, तरी तिच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहे. ती मात्र त्याच्यासमोर खुनशी स्वभावानेच प्रगट होते.

मिशेलही काही धुतल्या तांदळासारखी नाही. मैत्रिणीचा नवरा तिने गुपचूप गटवलाय आणि घरासमोर राहणाऱ्या व्यक्तीला (दुर्बिणीतून ) वाईट नजरेने पाहून नवयौवनेसमान  खोडय़ा करण्याची तिची हातोटी आहे.

आपल्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा ती अंदाज करते, पण कोणत्याही निष्कर्षांवर येत नाही. सतत त्या बलात्काऱ्याचा विचार करून ती आयुधसज्ज राहते. ऑफिसातील बॉसगिरी करते. वाईट भूतकाळ आठवते आणि जगण्यातल्या एकांताशी क्रूरतेने लढते.

षड्रिपूतील सर्वच गोष्टींचा पर्याप्त परिपाक असलेली ही नायिका नातेसंबंधांच्या चक्रातून अधिक चक्रावलेली दिसते. तिची मरणाकडे टेकलेली आई एका तरुणासोबत लग्न करण्याच्या उत्साहात आणि मिशेल तिची खिल्ली उडविण्याच्या बेतात दिसते. तिच्या मुलाला होणाऱ्या बाळाचा रंग पाहून ते कुणाचे आहे, याचा जाहीरपणे निष्कर्ष काढून मुलाला डिवचणारी आणि आजी झाल्याचा आनंद समोर राहणाऱ्या व्यक्तीसमोर सहज काढून त्याचा पस्तावा करणाऱ्या मिशेलचा धूर्त करारीपणा दिसतो.

हा चित्रपट दिग्दर्शकाच्या पूर्वीच्या सिनेमांसारखा अ‍ॅक्शनपट नाही, त्यात बलात्काऱ्याचे रहस्य मध्यांतरातल्या प्रसंगांपर्यंत स्पष्ट झालेले असले, तरी ते उलगडेपर्यंत त्याची रचना हिचकॉकसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या रहस्यपटासारखी झाली आहे. चित्रपट खरे तर नातेसंबंधांच्या आजच्या बदललेल्या विचित्र स्वरूपावर भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यात अगणित घटकांना, व्यक्तिरेखांना, प्रसंगांना आणि मानवी जीवनातील लैंगिक अपरिहार्यतेला स्पर्श केला गेला आहे. पण सर्वात महत्त्वाचे आहे, ते या सगळ्या गोष्टींमध्ये मुरलेली व्यक्तिरेखा वठविणाऱ्या इझाबेल हुपेअर हिचे अभिनयकौशल्य. बलात्काऱ्याशी दोन हात करण्याइतपत ताकद नसली आणि भवतालच्या जगातील ताण्याबाण्यांना सहन करण्याची हिंमत नसली, तरी ती त्यांच्याशी कशी लढते हे पाहणे येथे महत्त्वाचे ठरेल. नियमांना बगल देऊन एखाद्या परभाषिक सिनेमातील व्यक्तिरेखा हॉलीवूड सिनेमांच्या अभिनेत्रीशी टक्कर देतानाही उद्या होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. ग्लोब पुरस्कारांमध्ये ला ला लॅण्डच्या एमा स्टोनचा पराभव करणारी अभिनेत्री ऑस्करमध्येही याची पुनरावृत्ती करते का पाहायला हवे. त्यासाठीच फ्रेन्च चित्रपटाची या सदरात नियम डावलून वर्णी लागली आहे.