Oscars 2022 Updates, 94th Academy Awards: सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कारावर नाव कोरले. ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.
त्यासोबत किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर ‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘कोडा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. यावेळी ‘कोडा’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीममधील कलाकारांना ऑस्करमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले.
दरम्यान वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटानं सहा पुरस्कार जिंकले आहेत. ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ असे एकूण सहा पुरस्कार जिंकले आहेत. तर ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ५३ वर्षीय ट्रॉय यांचा हा पहिला ऑस्कर असून पुरस्कार स्विकारतेवेळी ते भावूक झाले.
Oscars Awards 2022 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती. तर ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश आहे.
'कोडा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. यावेळी कोडा चित्रपटाच्या संपूर्ण टीममधील कलाकारांना ऑस्करमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले.
'The Eyes of Tammy Faye' या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
जेन कॅम्पियन यांना 'द पॉवर ऑफ द डॉग' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे. या श्रेणीत पॉल थॉमस अँडरसन, केनेथ ब्रानाघ, स्टीव्हन स्पीलबर्ग, रुसुके हामागुची यांनाही नामांकन मिळाले होते.
जेम्स बाँडच्या 'नो टाइम टू डाय' या गाण्यासाठी बिली एलिशला सर्वोत्कृष्ट मूळ गायकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. बिलीचा हा पहिलाच अकादमी पुरस्कार आहे.
प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट म्हणून जॅक स्नायडरच्या 'आर्मी ऑफ द डेड' ची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली.
सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.
बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार हंस झिमर यांना मिळाला आहे. ड्यून या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.
बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार शॉन हेडर यांना मिळाला आहे. त्यांना कोडा या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. यावेळी ते फार भावूक झाले
'द लाँग गुडबाय' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. अनिल कारिया यांच्यासह या चित्रपटाचे लेखन रिझ यांनी केले आहे.
केनेथ ब्रानाघ (Kenneth Branagh) निर्मित बेलफास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार क्रुएला चित्रपटासाठी जेनी बेवन यांना मिळाला.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांसाठी ऑस्कर सोहळ्यात मौन पाळण्यात आले.
'ड्राइव्ह माय कार'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ड्राईव्ह माय कार, फ्ली, द हँड ऑफ गॉड, लुनाना: अ याक इन द क्लासरूम, द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड यांना देखील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले होते.
ट्रॉय कोत्सुर (Troy Kotsur) यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ५३ वर्षीय ट्रॉय यांचा हा पहिला ऑस्कर आहे. हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले.
यंदाच्या वर्षी जेम्स बाँडला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या खास प्रसंगी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेम्स बाँडच्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
‘डय़ून’ या चित्रपटाला आतापर्यंत सहा ऑस्कर मिळाले आहेत
ड्युन या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार जिंकला. आतापर्यंत या चित्रपटाला ६ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.
ग्रेग फ्रेझर यांना ‘ड्यून’ या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफी या विभागात ऑस्कर मिळाला आहे.
अभिनेत्री अॅरियाना डीबोसला यंदाचा ९४ व्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'वेस्ट साइड स्टोरी' चित्रपटातील अभिनयासाठीत तिला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात तिने अनिता नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती.
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी देण्यात येणारा ऑस्कर 'द आय ऑफ टॅमी फेय'ला मिळाला आहे.
ड्यून या चित्रपटाला बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ चित्रपटाला आतापर्यंत तिसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट फिल्म् एडिटिंगचा ऑस्कर पुरस्कार ड्यूनने पटकावला आहे.
वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ चित्रपटाला बेस्ट ओरिजनल स्कोर हा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
रॉबर्ट अल्टमॅन यांची निर्मिती असलेल्या 'दी लाँग गुडबॉय' ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला आहे.
'द विंडशिल्ड वायपर' ने बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट प्रकारात 'दी क्वीन ऑफ बास्केटबॉल' ला ऑस्कर पुरस्कार जाहीर
बेस्ट साऊंडचा ऑस्कर पुरस्कार वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ या चित्रपटाला मिळाला आहे.
Oscars Awards 2022 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती. तर ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश आहे.