Oscars 2022 Updates, 94th Academy Awards: सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कारावर नाव कोरले. ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यासोबत किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर ‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘कोडा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. यावेळी ‘कोडा’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीममधील कलाकारांना ऑस्करमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले.

दरम्यान वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटानं सहा पुरस्कार जिंकले आहेत. ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ असे एकूण सहा पुरस्कार जिंकले आहेत. तर ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ५३ वर्षीय ट्रॉय यांचा हा पहिला ऑस्कर असून पुरस्कार स्विकारतेवेळी ते भावूक झाले.

Live Updates

Oscars Awards 2022 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती. तर ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश आहे.

05:28 (IST) 28 Mar 2022
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्करची धामधुम सुरु

https://twitter.com/RottenTomatoes/status/1508156901665685508

05:25 (IST) 28 Mar 2022
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात

https://twitter.com/ABCNetwork/status/1508096578195709952

05:21 (IST) 28 Mar 2022
Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ऑस्कर पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड कशी केली जाते?

https://twitter.com/LoksattaLive/status/1507651125969039361

05:19 (IST) 28 Mar 2022
९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत, ‘या’ चित्रपटाला मिळाले नामांकन

९४ व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील एका माहितीपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे.

https://twitter.com/LoksattaLive/status/1507635180269637635

05:17 (IST) 28 Mar 2022
‘अकादमी पुरस्कार’ अशीही खास ओळख
  • ऑस्कर पुरस्कारला ‘अकादमी पुरस्कार’ या नावानेही ओळखले जाते.
  • चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो.
  • १९२७ मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीचे उद्दिष्ट हे मोशन पिक्चर्सच्या कला आणि विज्ञानांची प्रगती करणे असा आहे.
  • 05:15 (IST) 28 Mar 2022
    ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची खास वैशिष्ट्ये
  • कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार
  • चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान
  • सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरव
  • Oscars Awards 2022 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती. तर ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश आहे.