कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. अँड द ऑस्कर गोज टू…हे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले आहेत. ९४ व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील एका माहितीपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द पॉवर ऑफ डॉग’ ला सर्वाधिक नामांकने

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी २७ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरु होणार आहे. पण वेळेतील फरकामुळे भारतात सोमवारी (२८ मार्च) पहाटे ५.३० वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत.

भारतातून फक्त एका माहितीपटाला नामांकन

तर ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून फक्त एका माहितीपटाला नामांकन मिळाले आहे. ९४ व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश झाला आहे. ‘रायटिंग विथ फायर’ हा रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट आहे. यापूर्वी या माहितीपटाला सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा असे दोन पुरस्कारही मिळाले आहेत.

Oscars Awards 2022 : काऊंटडाऊन सुरु! कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार सोहळा? वाचा सविस्तर

तर हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत. वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ या चित्रपटाला दहा नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात ‘द हँड ऑफ गॉड’, ‘लुनाना: अ याक इन द क्लासरूम’, ‘द वस्र्ट पर्सन इन द वल्र्ड’, ‘ड्राईव्ह माय कार’ आणि ‘फ्ली’ या चित्रपटांना नामांकन जाहीर झाले आहे.

विश्लेषण : ऑस्करसाठीचे नामांकन आणि विजेते कसे निवडले जातात? जाणून घ्या…

सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागासाठी ‘बेलफास्ट’, ‘कोडा’, ‘डोन्ट लूक अप’, ‘डय़ुन’, ‘ड्राईव्ह माय कार’, ‘किंग रिचर्ड’, ‘लिकोरिस पिझ्झा’, ‘नाईटमेअर अ‍ॅली’, ‘द पॉवर ऑफ द डॉग’ आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. आता यातील कोणाकोणाला ऑस्कर पुरस्कार मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.