यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास आहे, कारण राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. ऑस्कर २०२३ च्या सोहळ्याला आता फक्त तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे हा सोहळा कधी, कुठे किती वाजता पाहता येणार, याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.

ऑस्कर सोहळा कधी पाहायला मिळणार?

Oscar 2023 रविवारी, १२ मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सोहळा आपल्याला १३ मार्चच्या पहाटे ५:३० वाजता पाहता येईल.

BJP leader son marriage
भाजपा नेत्याच्या घरी येणार पाकिस्तानी सून; नुकताच पार पडला ऑनलाईन विवाह; पाहा VIDEO
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Feature Price Compare
मारुतीला टक्कर द्यायला लवकरच येणार स्कोडाची ‘ही’ एसयूव्ही, इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये कोण ठरेल वरचढ? घ्या जाणून…
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
Rohit Sharma Lamborghini Urus Blue car number plate
मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसणाऱ्या रोहितच्या लॅम्बोर्गिनीची किंमत किती? कारचा नंबर तर आहे खूपच खास
Passengers upset, Kasara local time, Karjat local time,
शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज
rice price drop global market
भारत आणि पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातीमुळे जागतिक बाजारातील तांदळाच्या दरात घसरण; कारण काय?
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!

“मला माझाच बाप गेल्या सारखं वाटतंय” सतीश कौशिक यांच्या निधनानंतर किशोर कदमांची भावूक पोस्ट; म्हणाले, “आपण सगळे…”

ऑस्कर सोहळा कुठे पाहायचा?

Disney+Hotstar वर भारतातील दर्शकांसाठी अवॉर्ड शो लाइव्ह प्रसारित केला जाईल. तसेच ABC नेटवर्कच्या YouTube, Hulu Live TV, Direct TV, FUBO TV आणि AT&T TV यासह विविध प्लॅटफॉर्मवरही हा सोहळा पाहायला मिळेल. दर्शक शो ABC.com आणि ABC अॅपवर देखील पाहू शकतात.

ऑस्कर २०२३ चे होस्ट कोण असणार?

गेल्या वर्षी हा सोहळा रेजिना हॉल, अ‍ॅमी शुमर आणि वांडा सायक्स या तिघांनी होस्ट केला होता. पण यंदा मात्र एकच होस्ट असणार आहे. होस्ट आणि कॉमेडियन जिमी किमेल यंदाचा ऑस्कर सोहळा होस्ट करणार आहे. या वर्षीच्या ऑस्कर प्रेझेंटर्सनमध्ये मायकेल बी. जॉर्डन, हॅले बेरी, हॅरिसन फोर्ड, पेड्रो पास्कल, फ्लॉरेन्स पग, अँड्र्यू गारफिल्ड, केट हडसन, दीपिका पदुकोण आणि लिटल मर्मेड स्टार हॅले बेली यांचा समावेश आहे.

Video: “मृत्यू जीवनाचा शेवट आहे, नात्यांचा…” सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

यंदाच्या ऑस्करमध्ये दीपिका पदुकोण दिसणार

या वर्षीच्या ऑस्कर प्रेझेंटर्सनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश आहे. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीला हा मान मिळाला आहे. एमिली ब्लंट, सॅम्युअल एल जॅक्सन, ड्वेन जॉन्सन, मायकेल बी जॉर्डन, जेनेल मोने, झो सलडाना, जेनिफर कोनेली, रिझ अहमद आणि मेलिसा मॅककार्थी यांच्यासारख्या कलाकारांबरोबर ती प्रेझेंटर असेल. दरम्यान, ऑस्करसाठी दीपिका भारतातून रवाना झाली आहे.

Video: जेव्हा लेक वंशिकाबरोबर थिरकलेले सतीश कौशिक; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास

‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. यंदा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, त्यामुळे भारतीय प्रेक्षकही ऑस्करसाठी उत्सुक आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ऑस्करच्या मंचावर लाइव्ह सादर करणार आहेत.