Oscar Awards 2025 Winners List : ऑस्कर पुरस्कार हा जगभरातील चित्रपटांसाठी दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आज ९७ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या वर्षी, कोणत्याही भारतीय चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकन मिळालं नव्हतं. गुनीत मोंगा व प्रियांका चोप्राची सह-निर्मिती असलेल्या अनुजाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये फायनल नॉमिनेशन मिळाले होते, पण तो ऑस्कर जिंकू शकला नाही. ऑस्कर सोहळ्यातील विजेत्यांची यादी जाणून घ्या.
97th Academy Awards 2025 Live Updates
And the Oscar goes to...
'अनोरा' यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
मिकी मॅडिसन ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.
सीन बेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सीन बेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. 'अनोरा'साठी त्याने हा पुरस्कार पटकावला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा यंदाचा ऑस्कर ॲड्रियन ब्रॉडीने द ब्रुटलिस्टसाठी पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर कोणी पटकावला?
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर द ब्रुटलिस्टसाठी लोल क्रॉलीने पटकावला.
I'm NOT A ROBOT ला मिळाला ऑस्कर
I'm NOT A ROBOT ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी ऑस्कर पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर
DUNE: 2 ने सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ऑस्कर पटकावला.
नो अदर लँड बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म
नो अदर लँडने पटकावला बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मसाठी ऑस्कर पुरस्कार
बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर
द गर्ल इन द ऑर्केस्ट्राने बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पटकावला.
एमिलिया पेरेझच्या 'El Mal' गाण्याला ऑस्कर
क्लेमेंट ड्युकोल, कॅमिल आणि जॅक ऑडियर्ड यांनी एमिलिया पेरेझच्या 'El Mal' या गाण्यासाठी बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर जिंकला!
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कोण?
एमिलिया पेरेझसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर अभिनेत्री झो साल्दानाने जिंकला.
बेस्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर कुणाला?
बेस्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर अनोरासाठी सीन बेकरला देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंगसाठी ऑस्कर
THE SUBSTANCE ने सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंगसाठी ऑस्कर जिंकला.
बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर कुणाला?
बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर कॉनक्लेव्हसाठी पीटर स्ट्रगनला देण्यात आला.
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर कुणाला?
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर 'अनोरा'साठी शॉन बेकर देण्यात आला.
पॉल टेझवेल सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर
पॉल टेझवेलला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर कोणाला?
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर इन द शॅडो ऑफ द सायप्रससाठी शिरीन सोहनी आणि होसेन मोलायेमी यांना देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार कोणाला?
FLOW ने सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मसाठी ऑस्कर जिंकला आहे.
कियरन कल्किनने अ रिअल पेनसाठी जिंकला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार
रेड कार्पेटवर अभिनेत्याने अभिनेत्रीला केलं किस
द ब्रुटलिस्ट या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालेला अभिनेता ॲड्रिन ब्रॉडी याने रेड कार्पेटवर अभिनेत्रीला लिप लॉक केले.
कोको जोन्सचा ऑस्कर २०२५ मधील लूक पाहा...
‘ऑस्कर २०२५’मध्ये भारतीय सिनेप्रेमींचं लक्ष 'या' शॉर्टफिल्मकडे
‘ऑस्कर २०२५’मध्ये भारतीय सिनेप्रेमींचं लक्ष ‘अनुजा’ या शॉर्टफिल्मवर असणार आहे. अॅडम जे ग्रेव्हज दिग्दर्शित ‘अनुजा’ या शॉर्टफिल्मची निर्मिती गुनीत मोंगा, प्रियांका चोप्रा आणि अन्य काही जणांनी मिळून केली आहे. या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह अॅक्शन) या श्रेणीत नामांकन मिळालं आहे.
ऑस्करसाठी ब्रेटमन रॉकचा खास लूक
यंदा सर्वाधिक नॉमिनेशन कोणाला?
फ्रेंच चित्रपट एमिलिया पेरेझला १३ आणि हॉलीवूड चित्रपट द ब्रुटालिस्टला १० वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सर्वाधिक नॉमिनेशन्स मिळाले आहेत.
कॉमेडियन ब्रायन यंदा पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा होस्ट करत आहे.
ऑस्कर पुरस्कार २०२५ लाईव्ह | ९७ वे ऑस्कर पुरस्कार २०२५