Oscar Awards 2025 Winners List : ऑस्कर पुरस्कार हा जगभरातील चित्रपटांसाठी दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आज ९७ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या वर्षी, कोणत्याही भारतीय चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकन मिळालं नव्हतं. गुनीत मोंगा व प्रियांका चोप्राची सह-निर्मिती असलेल्या अनुजाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये फायनल नॉमिनेशन मिळाले होते, पण तो ऑस्कर जिंकू शकला नाही. ऑस्कर सोहळ्यातील विजेत्यांची यादी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

97th Academy Awards 2025 Live Updates

09:27 (IST) 3 Mar 2025

And the Oscar goes to…

‘अनोरा’ यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

09:13 (IST) 3 Mar 2025

मिकी मॅडिसन ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1896404819319136730

09:09 (IST) 3 Mar 2025

सीन बेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

सीन बेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘अनोरा’साठी त्याने हा पुरस्कार पटकावला.

08:54 (IST) 3 Mar 2025
यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण?

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा यंदाचा ऑस्कर ॲड्रियन ब्रॉडीने द ब्रुटलिस्टसाठी पटकावला आहे.

08:27 (IST) 3 Mar 2025

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर कोणी पटकावला?

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर द ब्रुटलिस्टसाठी लोल क्रॉलीने पटकावला.

08:21 (IST) 3 Mar 2025

I’m NOT A ROBOT ला मिळाला ऑस्कर

I’m NOT A ROBOT ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी ऑस्कर पटकावला आहे.

08:08 (IST) 3 Mar 2025

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर

DUNE: 2 ने सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ऑस्कर पटकावला.

07:50 (IST) 3 Mar 2025

नो अदर लँड बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म

नो अदर लँडने पटकावला बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मसाठी ऑस्कर पुरस्कार

07:47 (IST) 3 Mar 2025

बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर

द गर्ल इन द ऑर्केस्ट्राने बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पटकावला.

https://twitter.com/TheAcademy/status/1896382799277642232

07:36 (IST) 3 Mar 2025

एमिलिया पेरेझच्या ‘El Mal’ गाण्याला ऑस्कर

क्लेमेंट ड्युकोल, कॅमिल आणि जॅक ऑडियर्ड यांनी एमिलिया पेरेझच्या ‘El Mal’ या गाण्यासाठी बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर जिंकला!

07:19 (IST) 3 Mar 2025

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कोण?

एमिलिया पेरेझसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर अभिनेत्री झो साल्दानाने जिंकला.

07:13 (IST) 3 Mar 2025

बेस्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर कुणाला?

बेस्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर अनोरासाठी सीन बेकरला देण्यात आला.

07:11 (IST) 3 Mar 2025

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंगसाठी ऑस्कर

THE SUBSTANCE ने सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंगसाठी ऑस्कर जिंकला.

06:58 (IST) 3 Mar 2025

बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर कुणाला?

बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर कॉनक्लेव्हसाठी पीटर स्ट्रगनला देण्यात आला.

06:47 (IST) 3 Mar 2025

बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर कुणाला?

बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर ‘अनोरा’साठी शॉन बेकर देण्यात आला.

06:34 (IST) 3 Mar 2025

पॉल टेझवेल सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर

पॉल टेझवेलला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

06:28 (IST) 3 Mar 2025

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर कोणाला?

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर इन द शॅडो ऑफ द सायप्रससाठी शिरीन सोहनी आणि होसेन मोलायेमी यांना देण्यात आला.

06:15 (IST) 3 Mar 2025

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार कोणाला?

FLOW ने सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मसाठी ऑस्कर जिंकला आहे.

06:02 (IST) 3 Mar 2025
कियरन कल्किन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

कियरन कल्किनने अ रिअल पेनसाठी जिंकला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार

05:53 (IST) 3 Mar 2025

रेड कार्पेटवर अभिनेत्याने अभिनेत्रीला केलं किस

द ब्रुटलिस्ट या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालेला अभिनेता ॲड्रिन ब्रॉडी याने रेड कार्पेटवर अभिनेत्रीला लिप लॉक केले.

https://twitter.com/TheAcademy/status/1896349118647390347

05:34 (IST) 3 Mar 2025
कोको जोन्सचा खास अंदाज

कोको जोन्सचा ऑस्कर २०२५ मधील लूक पाहा…

05:17 (IST) 3 Mar 2025

‘ऑस्कर २०२५’मध्ये भारतीय सिनेप्रेमींचं लक्ष ‘या’ शॉर्टफिल्मकडे

‘ऑस्कर २०२५’मध्ये भारतीय सिनेप्रेमींचं लक्ष ‘अनुजा’ या शॉर्टफिल्मवर असणार आहे. अ‍ॅडम जे ग्रेव्हज दिग्दर्शित ‘अनुजा’ या शॉर्टफिल्मची निर्मिती गुनीत मोंगा, प्रियांका चोप्रा आणि अन्य काही जणांनी मिळून केली आहे. या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह अ‍ॅक्शन) या श्रेणीत नामांकन मिळालं आहे.

05:13 (IST) 3 Mar 2025
ऑस्करसाठी ब्रेटमन रॉकचा लूक

ऑस्करसाठी ब्रेटमन रॉकचा खास लूक

https://twitter.com/TheAcademy/status/1896341062135996633

05:11 (IST) 3 Mar 2025

यंदा सर्वाधिक नॉमिनेशन कोणाला?

फ्रेंच चित्रपट एमिलिया पेरेझला १३ आणि हॉलीवूड चित्रपट द ब्रुटालिस्टला १० वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सर्वाधिक नॉमिनेशन्स मिळाले आहेत.

05:10 (IST) 3 Mar 2025
यंदा ऑस्करचा होस्ट कोण?

कॉमेडियन ब्रायन यंदा पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा होस्ट करत आहे.

ऑस्कर पुरस्कार २०२५ लाईव्ह | ९७ वे ऑस्कर पुरस्कार २०२५