श्रुती कदम

चित्रपटसृष्टीत सध्या अनेक वेगवेगळे प्रयोग होत आहेत. विविध विषयांची मांडणी केली जाते आहे. मात्र आशय-विषयाच्या मांडणीपासूनच भूमिकेतील वेगळेपणा राखत उत्तम आशय देण्याचं स्वातंत्र्य असल्याने ओटीटीवरच्या हटके कलाकृतींचे प्रमाणही वाढले आहे. आणि ओटीटीवर गुन्हेगारी विश्व, प्रेमकथा, वास्तव घटनांवर आधारित वेबमालिका वा वेब चित्रपट अशा हरतऱ्हेच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे चांगल्या चित्रपटाची वाट पाहत बसण्यापेक्षा घरबसल्या उत्तम आशय आणि मनोरंजन उपलब्ध करून देणाऱ्या ओटीटी वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या करोना काळापासून सातत्याने वाढतीच राहिलेली आहे. ओटीटीवर जगभरातील प्रेक्षक आपले काम पाहतात आणि ते सर्वदूर पसरते याची जाणीव असल्याने रुपेरी पडद्यावरील अनेक मोठे, वलयांकित कलाकार हळूहळू करत या माध्यमावर उतरले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक कलाकारांनी ओटीटीवर पदार्पण केले असून हा सिलसिला सुरूच आहे. येत्या काही महिन्यांतही आणखी काही प्रसिद्ध कलाकार ओटीटीवर वेगवेगळय़ा भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

गेल्या काही महिन्यांत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी वेगवेगळय़ा विषयांच्या आधारे ओटीटी माध्यमांवर प्रदार्पण केले. तर काही कलाकारांनी या ओटीटी माध्यमांवरून वेगवेगळय़ा गंभीर विषयांवरील आव्हानात्मक भूमिका साकारणे सुरू ठेवले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ओटीटी माध्यमांवर हिंदी भाषिक वेब मालिका आणि चित्रपट तुलनेने अधिक प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये नवोदित कलाकारांपासून ते अगदी नव्वदीचा काळ गाजवलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी केलेल्या चित्रपट आणि वेब मालिकांचे प्रमाण अधिक आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दीर्घ काळ रुपेरी पडद्यापासून लांब असलेल्या अभिनेत्री सोनम कपूर हिने ओटीटी माध्यमाद्वारे पदार्पण केले. तिचा ‘ब्लाइंड’ हा चित्रपट ७ जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा रिमेक असून सोनमने या चित्रपटात अंध मुलीची भूमिका साकारली होती. त्याआधी वर्षांच्या सुरुवातीलाच अभिनेता आदित्य रॉय कपूर ‘नाइट मॅनेजर’ या वेब मालिकेतून पदार्पण करता झाला. या वेबमालिकेचा दुसरा भागही आता प्रदर्शित झाला आहे.

१४ जुलैला प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिची ‘ट्रायल’ ही वेब मालिका प्रदर्शित झाली. या वेब मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री काजोलने ओटीटीवर पदार्पण केले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. खरंतर याआधी तिचे चित्रपट नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाले आहेत. मात्र दीर्घ लांबीची भूमिका असलेल्या वेबमालिकेतून काजोल पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली आहे. घरसंसार सांभाळणारी गृहिणी ते उत्तम वकील होण्यापर्यंतचा तिचा प्रवास या वेब मालिकेतून दाखवण्यात आला आहे. तसेच ‘वेड’ चित्रपटानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटातून २१ जुलैला जिओ सिनेमाद्वारे ओटीटी माध्यमावर पदार्पण केले आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा ‘बवाल’ हा चित्रपटदेखील जुलैमध्येच प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. ‘दंगल’फेम नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बवाल’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झोया अख्तरच्या ‘मेड इन हेवन’ या वेब मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. यामध्ये पहिल्या भागातील मोठय़ा कलाकारांबरोबरच सध्या ओटीटीवर प्रसिद्ध असलेले अनेक बॉलीवूड कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. अभिनेता पुलकित सम्राटने या वेबमालिकेतून ओटीटीवर पदार्पण केले असून दिया मिर्झा, मृणाल ठाकूर, राधिका आपटे अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांनी यात काम केले आहे. ओटीटीवर ‘आर्या’ या वेबमालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या रवी जाधव दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित ‘ताली’ या वेब मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकते आहे. तर या महिन्यात बॉलीवूडच्या आणखी एका मोठय़ा कलाकाराचे ओटीटीवर वेबमालिकेतील पदार्पण हा चर्चेचा विषय ठरला आहे. अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव याची गुन्हेगारी विश्वावर आधारित ‘गन्स अॅण्ड गुलाब्स’ ही वेब मालिका १८ ऑगस्टला ‘नेटफिल्क्स’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली आहे. यात त्याच्याबरोबर गुलशन देवय्या, दुलकर सलमान, आदर्श गौरव हे मुख्य भूमिकेत आहेत. या वेबमालिकेसाठी राजकुमारने सत्तरच्या दशकातील रेट्रो लूक धारण केला असून तोही प्रेक्षकांना आवडला आहे.

प्रेक्षकांची आवड लक्षात घेत आणखी काही बॉलीवूड कलाकार ओटीटीवर पदार्पण करत आहेत. लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर ‘जाने जा’ या आगामी चित्रपटातून नेटफ्लिक्सद्वारे ओटीटी माध्यमावर पदार्पण करणार आहे. तिचा हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून विजय वर्मा आणि जयदीप अहलावत तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुख्य भूमिका असलेला आगामी चित्रपट ‘हड्डी’ देखील झी ५ या ओटीटी माध्यमावर ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे.