सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींवरून सगळीकडेच चर्चा होत आहे. या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचं बंधन नसल्याने इथे सर्रास अश्लील आणि हिंसक गोष्टी आपल्याला बघायला मिळतं. नुकतंच दिग्दर्शिका एकता कपूरला याचसंदर्भात कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. एकताचं हे प्रकरण चांगलंच गाजलं आणि लोकांनी त्यावर टीकासुद्धा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता पुन्हा ओटीटी विश्वातील अशा एका घटनेने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. २६ वर्षीय व्यक्तीने आपल्याला जबरदस्ती एका ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका अ‍ॅडल्ट चित्रपटात काम करायला लावल्याचे आरोप केले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी यासाठी या व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली आहे.

आणखी वाचा : ‘झुंड’च्या यशानंतर नागराज मंजुळे घेऊन येत आहेत ‘घर बंदूक बिरयानी’, चित्रपटाबाबत नवी माहिती समोर

केरळमधील वेंगनूर शहरात ही व्यक्ती राहत असून तिथल्या पोलिसांनी याविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्या चित्रपटाशी संबंधीत लोकांची कसून चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. प्रकरण फारच संवेदनशील असल्याने त्या व्यक्तीचे नाव आणि खासगी माहिती ही गुप्त ठेवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

तक्रारकर्त्याचा हा शूटिंगचा पहिलाच अनुभव होता आणि करारावर लिहिलेल्या गोष्टी नीट न वाचता त्यावर सही केल्याने त्याला हा अनुभव आल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. ही एक अ‍ॅडल्ट फिल्म आहे हे समजताच त्या व्यक्तीने शूटिंगसाठी नकार दिला. त्यावर तिथल्या लोकांनी त्याला ब्लॅकमेल केलं आणि शूटिंग न केल्यास ५ लाखाचा दंड भरावा लागेल असं सांगितलं. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत, हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे आणि त्यावर बंदी आणण्यासाठी या व्यक्तीने मीडियाचीदेखील मदत घेतली आहे.