कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे कार्तिकच्या चित्रपटांची प्रेक्षक आवर्जून वाट बघत असतात. कार्तिकच्या ‘भूल भुलैया २’ने अनेक रेकॉर्ड्स मोडले. पण आता त्याचा आगामी चित्रपट ‘फ्रेडी’ थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. गेले काही दिवस कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातील काही चित्रपटांचे शूटिंग त्याने पूर्ण केले असून ते रिलीजसाठी सज्ज आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिक काही महिन्यांपूर्वी ‘फ्रेडी’ या चित्रपटावर काम करत होता. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मध्यंतरी या चित्रपटाचं पोस्टरसुद्धा समोर आलं होतं. या पोस्टरने लोकांची उत्सुकता चांगलीच ताणली होती. आता नुकताचा या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या छोट्याश्या टीझरमधून प्रेक्षकांना आणखीन या चित्रपटाकडे आकर्षित करण्यात निर्मात्यांना यश मिळालं आहे.

आणखी वाचा : नातीला भेटायला महेश भट्ट प्रचंड उत्सुक; आलिया-रणबीरने दिलेल्या गोड बातमीनंतर रमले जुन्या आठवणींमध्ये

टीझरमधून कार्तिक एका डेंटिस्टचं पात्र निभावतोय हे स्पष्ट होतंय, शिवाय त्याचं हे पात्र बरंच विचित्र असल्याचंही आपल्यासमोर येत आहे. एकूणच या पात्रात आणखीन बऱ्याच गोष्टी दडल्या आहेत ज्या चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजतील. पण या टीझरमधून कार्तिकच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. कार्तिकचे चाहते तर या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

कार्तिकचं हे पात्र लाजाळू आहे, एकाकी आहे पण यामागेसुद्धा बरीच रहस्यं दडली आहेत हे टीझरमधून स्पष्ट होत आहे. शशांक घोष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या वर्षअखेरीस म्हणजेच २ डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिकने आर्यनने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A shy dentist or serial killer kartik aaryan most awaited movie freddy teaser out avn