‘आई कुठे काय करते?’ मालिकेतून घराघरात पोहोचलेलं अरुंधती हे पात्र महिलांसाठी आयडॉल ठरलं आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही भूमिका उत्तमरीत्या निभावत आहे. तिच्या या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकही भरभरून प्रेम करीत आहेत. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांत मधुराणीनं आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. पण, आता ती ओटीटी माध्यमात काम करणार की नाही, याबाबत तिनं स्वतः खुलासा केला आहे. तसेच या अभिनेत्रीनं ओटीटीवरील सेक्स व हिंसा या विषयांवरच्या सध्याच्या वेब सीरिजबद्दल परखड मत मांडलं आहे.

‘इसापतीनी एंटरटेन्मेंट’ या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत मुधराणीला विचारण्यात आलं की, “ओटीटी प्लॅटफॉर्म ज्या पद्धतीने वाढतोय, त्याबाबत तुझं म्हणणं काय आहे? ओटीटी माध्यमावर तुला काम करायला आवडेल का? किंवा तू त्या संदर्भात काही करतेयस का?” त्यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, मी एक-दोन स्क्रिप्टवर काम करतेय. पण त्यातली भूमिका वेब सीरिजप्रमाणे आहे का, ते मला माहीत नाही. पण, काही संकल्पना माझ्या मनात आहेत; ज्या सध्या मी फक्त कागदावर उतरवतेय. जर इतर कोणी सीरिज करीत असेल आणि चांगली भूमिका असेल, तर मला कुठल्याही भूमिकेसाठी काम करायला आवडेल. ओटीटीमध्ये टीआरपीची फारशी बंधने नाहीत; मात्र त्याच्यातही तोचतोचपणा आहे. सेक्स व हिंसा या विषयांशिवाय काही चालत नाही, असं एक समीकरण तयार झालंय; पण हे समीकरण मोडलं जाईल. आपण चांगला विषय तयार करू आणि तोही लोक बघतायत हे दाखवून देऊ.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीने ‘या’ चित्रपटातील गाणी केलीत संगीतबद्ध; श्रेया घोशाल, आरती अंकलीकर होत्या गायिका

हेही वाचा – “सेक्सची भूक ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो”; किरण मानेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

मधुराणीच्या उत्तरावर मुलाखतदार म्हणतो, “पण खरंय आहे ते, वेब सीरिज या दोन-तीन गोष्टींसाठी चालतात. हा पायंडा कुठेतरी आपण तोडायला पाहिजे.’ त्यावर मधुराणी म्हणते की, “खरं सांगू, मी अशा सीरिज बघू शकत नाही. मी बघण्याचा प्रयत्न केला; पण असा विषय मी आत्मसात करू शकत नाही. तो माझा स्वभाव नाही.”

हेही वाचा – Bigg Boss मध्ये सुरू झालेली आणखी एक लव्हस्टोरी संपली; ‘या’ जोडीचा झाला ब्रेकअप

“एक-दोन दिवसांपूर्वी कोणीतरी ‘ही’ सीरिज बघितली का म्हणून? खूप मागे लागलं होतं. पण, मला असं वाटतं की, ज्या विषयामधून मला आनंद व मनशांती मिळत नाही किंवा काही प्रेरणादायी मिळत नसेल, तर मी ते बघत नाही. सेक्स व हिंसा या विषयांवर असलेल्या सीरिज मला त्रास देतात. माझ्यासाठी डोकं ठिकाणावर ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. मी जेव्हा सीरिज बघते तेव्हा फार घुसून बघते. मला छान गोष्टी बघायला आवडतात. त्यामुळे मी तसा विषय शोधत असते. पण, असा विषय ओटीटीवर मिळणं फार मुश्कील आहे,” असं मधुराणी स्पष्टपणे म्हणाली.

Story img Loader