बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान याने अखेर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. जुनैदचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच इतर चित्रपट साइन करून शुटिंग सुरू केलं होतं, त्यामुळे त्याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता होती. जुनैदने ‘महाराज’ चित्रपटात मुख्य भूमिका केली असून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाबद्दल व जुनैदच्या अभिनयाबद्दल चाहते व समीक्षक विविध प्रतिक्रिया देत आहेत, अशातच जुनैदने स्वतःच्या कामाबद्दल काय म्हटलं ते पाहुयात.

जुनैदने पहिल्या चित्रपटासाठी चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी आभार मानले आहेत. “प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहून मला किती आनंद झाला हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या क्षणी मला जे वाटत आहे ते मी व्यक्त करू शकत नाही. या चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा आणि चढ-उतारांनी भरलेला राहिला. मी खूप मेहनत घेतली आहे. खूप वजन कमी केलं आहे. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. शेवटी सर्व काही ठीक होतं,” असं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुनैद म्हणाला.

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

“महाराज हा खूप प्रेमाने बनवलेला चित्रपट आहे. हा चित्रपट आदराने बनवला आहे. या चित्रपटाला आणि माझ्या अभिनयाला चांगले रिव्ह्यू मिळाले त्याचा मला आनंद होत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. मला माहित आहे की माझ्यात सुधारणेला खूप वाव आहे. माझ्यातील चुका मला भविष्यात सुधारायच्या आहेत. आगामी प्रोजेक्ट्समध्ये मला कलाकार व क्रू सपोर्टिव्ह मिळतील, अशी मी आशा बाळगतो,” असं जुनैद म्हणाला.

अक्षय कुमारच्या सिनेमांवर लावलेले पैसे बुडाले, रकुल प्रीतच्या सासऱ्यांनी २५० कोटींचे कर्ज फेडायला…

जुनैद म्हणाला, “मला हे पात्र खूप आवडलं होतं. यशराज हे एक मोठे बॅनर आहे. त्यामुळे हा प्रकल्प निवडण्यासाठी खास कारण होतं.” वडील आमिर खानकडून सिनेमांबद्दल सल्ला घेण्याबाबत विचारलं असता जुनैद म्हणाला, “ते सहसा आम्हाला जे काही करायचे आहे ते करू देतात. काही विशिष्ट गोष्टींबद्दल ते सल्ला देतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता आणि त्यांना तो खूप आवडला होता.”

तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”

‘महाराज’ चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्राने केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने केली आहे. यात जुनैद खानशिवाय जयदीप अहलावत, शालिनी पांडे, शर्वरी वाघ यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार होता, पण गुजरात उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली होती, त्यानंतर तो एक आठवडा उशीरा म्हणजेच २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला.