Aashram 3 Part 2 : प्रकाश झा यांच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘आश्रम’ चा सीझन 3 नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर रिलीज झाला आहे. या मालिकेत बॉबी देओलने बाबा निरालाच्या भूमिकेतून लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर पम्मी पहेलवान, भोपा स्वामी आणि बबिता भाभी यांच्या भूमिकांची बरीच चर्चा झाली होती. मालिकेच्या तिन्ही सीझनमध्ये बॉबी देओलचे अनेक इंटिमेट सीन्स पाहायला मिळाले.

आधीच्या सीझनमध्ये त्रिधा चौधरीने बॉबी देओलबरोबर इंटिमेट सीन्स केले होते. तर सीझन 3 च्या दुसऱ्या भागात पम्मी पहेलवानने भोपा स्वामीबरोबर खूप इंटिमेट सीन दिले आहेत, याची खूप चर्चा होत आहे. पम्मीच्या भूमिकेतील मराठमोळी अदिती पोहनकर आणि भोपा स्वामीच्या भूमिकेतील चंदन रॉय सन्यााल यांच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. आता चंदनने अदितीबरोबरच्या इंटिमेट सीनबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

भोपा स्वामी उर्फ ​​चंदन रॉयने ‘फिल्मी बीट’शी बोलताना या इंटीमेट सीनबद्दल सांगितलं. अदितीबरोबर इंटिमेट सीन शूट करताना सेटवर कोणकोण होतं, त्याबद्दल चंदन म्हणाला. अदिती एक उत्तम अभिनेत्री आहे. हा सीन करण्यापूर्वी चंदन आणि आदितीने बराच वेळ एकत्र घालवला होता, असं त्याने सांगितलं.

शूटिंग करण्याआधी आदितीबरोबर वेळ घालवायचा चंदन

चंदन रॉय सान्याल म्हणाला, “आमच्या डीओपीशिवाय प्रकाश झा आणि दोन-तीन मुली सेटवर उपस्थित होत्या. अदिती स्वतः एक प्रोफेशनल आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि हे सीन करण्यापूर्वी मी तिच्याबरोबर खूप वेळ घालवला होता.”

चंदन पुढे म्हणाला की असे सीन करणं सोपं नाही. त्यामुळे प्रेमाने, काळजीपूर्वक सोबत काम करावं लागतं. “मी इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी सेटवर अदितीबरोबर खूप गप्पा मारल्या होत्या, ज्यामुळे मला तिचा विश्वास जिंकता आला. मी सेटवर तिच्यासोबत खूप वेळ घालवला,” असंही त्याने नमूद केलं.

दरम्यान, प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही सीरिज खूप गाजली. या सीरिजमुळे केवळ बॉबी देओल, पम्मी पहेलवान म्हणजेच अदिती पोहनकर आणि बबिता भाभीची भूमिका करणारी त्रिधा चौधरी यांना खूप लोकप्रियता मिळाली. यापैकी अदिती पोहनकरच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. तिन्ही सीझनमध्ये तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळाला. या सीरिजचा आगामी सीझन पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Story img Loader