अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ (Breathe: into the shadows) या वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चन, नित्या मेनन, अमित साध आणि सैयामी खेर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये होते. २०२० मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले होते. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. अभिषेकचे चाहते या सीरिजच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेली आर माधवन आणि अमित साध यांची ‘ब्रीद’ (Breathe) ही सीरिज खूप गाजली. प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून सीरिजची कथा पुढे नेत नव्या पद्धतीने ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही सीरिज तयार करण्यात आली. यामध्ये अभिषेकने साकारलेल्या डॉ. अविनाश सब्रवालला मानसिक आजार असतो. त्याच्या या स्थितीमुळे नकळत त्याच्या शरिरामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व (Personality) तयार होते. या आजारामुळे अविनाशच्या आयुष्याला कलाटणी मिळते. जसजसे कथानक पुढे जाते, तसतसा त्यातील थरार उलगडत जातो. दरम्यान या सीरिजसंबंधित खूप महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या साजिद खानला बहीण फराह खानचा पाठिंबा? सलमान खानला म्हणते…

या सीरिजचा पुढचा सीझन नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. या सीझनचे नवे पोस्टर नुकतेच शेअर करण्यात आले. पोस्टरमध्ये अभिषेक पाठमोरा उभा राहून भिंतीवर लावलेल्या गोष्टींकडे पाहत असल्याचे दिसते. समोरच्या भिंतीवर दशमुखी रावणाचे चित्र काढण्यात आले आहे. त्यासह तेथे चार-पाच लोकांचे फोटो आणि त्याच्या आजूबाजूला नोट्स लावलेले पाहायला मिळते. त्या फोटोंपैकी काही फोटोंच्या वर पेनाने फुल्या केल्याचे दिसते. भिंतीवरच्या रावणाचे मध्यभागी असलेल्या डोक्याच्या जागी अभिषेक उभा आहे.

आणखी वाचा – “हा चित्रपट…” ‘कांतारा’ पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

पोस्टरमध्ये सीरिजचा नवा सीझन ९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच कॅप्शनमध्ये “१० मुंडकी, १ मास्टरमाईंड. कुटुंबासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेला तो पुन्हा आलाय”, असे लिहिले आहे.

Story img Loader