हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतो. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिक त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
प्राइम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून मनोज यांनी ओटीटी विश्वात पदार्पण केलं. लोकांनी ही सीरिज अक्षरशः डोक्यावर घेतली. मध्यंतरी या वेबसीरिजचा दूसरा सीझनसुद्धा प्रदर्शित झाला अन् त्यालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या वेबसीरिजमधील त्यांनी साकारलेलं श्रीकांत तिवारी हे पात्र लोकांना खूप भावलं. आता या वेबसीरिजच्या पुढच्या सीझनची चर्चा सुरू आहे.
aआणखी वाचा : हॉट मोनोकीनी आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट; आहाना कुमराचा बोल्ड आणि मादक अंदाज पाहिलात का?
नुकतंच मनोज बाजपेयी यांनी यावर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनोज बाजेपेयी यांनी या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या वर्षअखेरीस ‘फॅमिली मॅन ३’चं चित्रीकरण सुरू होऊ शकतं असं मनोज बाजपेयी यांनी सांगितलं आहे. गेले बरेच दिवस चाहते या वेबसीरिजबद्दलच्या अपडेटची उत्सुकतेने वाट बघत होते.
आणखी वाचा : चित्रपटगृहात आदिवासी कुटुंबाला नाकारण्यात आला प्रवेश; प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याने व्यक्त केली खंत
‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचे अॅक्शन सीन्स चाहत्यांना प्रचंड आवडले. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शेवटी आता पुढल्या सीझनमध्ये श्रीकांत तिसऱ्या कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना दिसणार आहे असे संकेत देण्यात आले होते. आता सीझन ३ मध्ये निर्माते प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येतात हे पाहणं खरोखरच मनोरंजक असेल.